Join us  

CoronaVirus: मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी पुढे सरसावला खिलाडी कुमार, पोलिसांनी मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 5:43 PM

मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी पुढे सरसावला अक्षय कुमार

कोरोना व्हायरसने देशभरात थैमान मांडले आहे. या व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी बरेच सेलिब्रेटी पुढे सरसावले आहेत. जनजागृतीसोबतच काही सेलिब्रेटींनी आर्थिक सहाय्य देखील केली आहे. काही कलाकारांनी पीएम केअर फंडात निधी दिला आहे तर काहींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केली आहे. अनेक सेलिब्रिटींनी डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट्स दिलेत. अभिनेता अक्षय कुमारने देखील दिवस रात्र कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या पोलिसांना २ कोटींची मदत केली आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर याची माहिती दिली आहे. त्यांनी अक्षयचे आभार देखील मानले आहेत. शहराचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या मुंबई पोलिसांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी आपले योगदान महत्त्वाचे ठरेल', असे त्यांनी ट्विट केले आहे.

अक्षयने यापूर्वी मुंबई महानगर पालिकेला तीन कोटींची मदत केली होती. मुंबईतील करोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहेत.

मुंबईत टेस्टींग किट्स आणि मास्क कमी पडू नयेत यासाठी अक्षयने महापालिकेला तीन कोटींची मदत केली होती. तर पीएम केअर फंडसाठी अक्षयने २५ कोटींची मदत केली आहे.

टॅग्स :अक्षय कुमारमुंबई पोलीस