Join us  

Coronavirus: कोरोनाच्या दहशतीत अमिताभ बच्चन, म्हणाले- अशी पहिल्यांदाच पाहिली मुंबई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 12:16 PM

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत कोरोनाची भीती व्यक्त केली आहे.

कोरोना व्हायरसमुळे प्रत्येक जण दहशतीत जगत आहेत. सध्याचा काळ वाईट सुरू आहे. प्रत्येकजण स्वतःला सुरक्षित ठेवण्याबाबत गांभीर्याने पाहत आहेत. सामान्य व्यक्तींपासून सेलिब्रेटींनी स्वतःला घरात कैद करून घेतले आहे. परदेश तर दूर यावेळी कोणीही घराबाहेर पडण्यासाठी घाबरत आहे. चित्रपटगृहांपासून शॉपिंग मॉल, शाळा, जिम सगळ्या गर्दीच्या ठिकाणे बंद करण्यात आलं आहे. या परिस्थितीत बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत त्यांना वाटत असलेली भीती व्यक्त केली आहे.

अमिताभ बच्चन चित्रपटांशिवाय सोशल मीडियावर एक्टिव्ह आहेत. ते प्रत्येक गोष्टींवर आपलं मत व प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. नुकतेच त्यांनी कोरोनाच्या संदर्भात घरात बंद आणि निर्जन मुंबईबाबत आपली भीती व्यक्त केली. 

बिग बींनी ट्विटर अकाउंटवर लिहिले की, यापूर्वी मी कधीच मुंबई शहर असे पाहिले नव्हते. अशापद्धतीने सगळीकडे शांतता... अचानक तुम्हाला वाटते की तुम्ही मुंबईतील एकमात्र निवासी आहे. खबरदारी म्हणून सुरक्षित रहा आणि ठीक रहा. अमिताभ बच्चन यांची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या पोस्टवर चाहत्यांनी दमदार रिएक्शन समोर आली आहे.

बॉलिवूडच्या कलाकारांनी स्वतःला घरात कैद करून घेतले आहे. ते घरातच वेळ व्यतित करत आहेत. सेलेब्सने त्यांचे व्हिडिओ घरातूनच पोस्ट केले आहेत. या यादीत कतरिना कैफ, किम शर्मा, शिल्पा शेट्टी व जॅकलिन फर्नांडिस या कलाकारांचा समावेश आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याअमिताभ बच्चन