Join us  

Coronavirus : न्यूयॉर्कमध्ये गेल्या 12 दिवसांपासून घरात बंद आहे प्रियंका चोप्रा, शेअर केला हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 12:07 PM

प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे.

अमेरिकासुद्धा कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. महासत्ता असलेल्या या देशात 24 तासांत 100 जणांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेत कोरोनानं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 389वर गेली आहे. भारतात ही कोरोना रुग्णांची संख्या 425 वर गेली आहे. बॉलिवूडसह हॉलिवूडचे कलाकारही सध्या घरात आहेत. प्रियंका चोप्रा पती निक जोनससोबत गेल्या 12 दिवसांपासून न्यूयॉर्कमध्ये आयसोलेट झाली आहे. प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक रोमाँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रियंका पती निक जोनसच्या मांडीवर झोपलेली दिसतेय. निक जोनस प्रियंकाकडे बघतो आहे. प्रियंकाच्या बाजूला तिचा कुत्रा ही झोपलेला दिसतो आहे. सोशल मीडियावर या फोटोवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.

होळीसाठी निक आणि प्रियंका भारतात आले होते. ईशा अंबानीच्या प्री-होळी पार्टीत दोघांनीही खूप मस्ती केली होती. त्यानंतर प्रियंका न्यूयॉर्कला परतली. देशभरात कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी फक्त लॉकडाऊन पुरेसे नाही. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, डब्ल्यूएचओ(WHO)चे माईक रायन यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन पुरेसं नाही तर जे आजारी आहेत, पीडित आहेत त्यांना शोधण्याची आणि देखरेखीखाली ठेवण्याची गरज आहे. तसे केलं तरच हे थांबवता येऊ शकते असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :प्रियंका चोप्राकोरोना वायरस बातम्यानिक जोनास