Join us  

Coronavirus: दुबईत अडकला गायक सोनू निगम, घेतला 'हा' मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 1:59 PM

सोनू निगम सध्या दुबईत फसला आहे.

कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यातही वाढ झाली असून, 52वरून रुग्णांची संख्या आता 63वर पोहोचली आहे. मुंबईत 10 जणांना कोरोनाची लागण झाली असून, विदेशातून आलेल्या रुग्णांच्या संसर्गातून तिघांना बाधा झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 63वर पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या(रविवारी) देशभरात जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. 

गायक सोनू निगम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला यशस्वी आणि प्रभावी बनण्यासाठी प्रयत्न करतोय.  

आजतकच्या रिपोर्टनुसार सोनू निगम सध्या दुबईत आहे इच्छा असूनसुद्धा कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे तो भारतात परतू शकत नाहीय. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्यूचे सोनू निगमने समर्थन केले आहे. सोनूने त्याच्या चाहत्यांना पीएम मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्यास सांगितला आहे. सोनू स्वत: हे मिशन यशस्वी करण्यासाठी ऑनलाईन कॉन्सर्ट घेणार आहे.  

भारतात आरोग्यसेवा देणाऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना संगीताचा आनंद घ्या. आपल्या जवळच्या व्यक्तिंसोबत क्वालिटी टाइम स्पेंट करायला विसरु नका. 

देशभरात कोरोना व्हायरस अतिशय वेगाने पसरतो आहे. त्यात गायिक कनिका कपूर हिच्या बेजवाबदारपणा मुळे संपूर्ण देश हादरला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेली गायिका कनिका कपूर हिने लखनौमधील अनेक पार्टीच्या ठिकाणी उपस्थित राहिली. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.  

टॅग्स :सोनू निगमकोरोना वायरस बातम्या