Join us  

दिलीप कुमारांच्या 'त्या' डायलॉगचं कोरोना कनेक्शन; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 9:17 PM

दिलीप कुमार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.

देशभरात कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. रुग्णांना बेड मिळत नाही आहेत. तसेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि औषधांचा तुडवडा निर्माण झाला आहे. कोरोना काळातील गरजेच्या गोष्टींचा काळाबाजार होताना दिसत आहे. कोरोनाच्या भीषण परिस्थितीत काही लोकांचे हाल होताना दिसत आहेत. या सर्व गोष्टींवर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. कॉमेडियन कुणाल कामराने हा व्हिडीओ शेअर करून खास मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे.  

कॉमेडियन कुणाल कामराने अभिनेते दिलीप कुमार यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, माणुसकी नष्ट होतेय. हा व्हिडीओ ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असून यात दिलीप कुमार म्हणाताना दिसत आहेत की, 'लोक भूकेनं मरत होते, तेव्हा आपण अन्न जास्त किंमतीत विक्री करून आपले खिशे भरत होतो. शहरात आजार पसरला तेव्हा आपण औषधं चोरली आणि ती जास्त किंमतीला विकली. जेव्हा पोलीस चौकशीसाठी आले तेव्हा लोकांचे प्राण वाचवणारी औषधं आपण नाल्यांमध्ये फेकली. माणसाचा ठेवा वेळेवर त्याच्या कामी येऊ दिलाच नाही. '

दिलीप कुमार यांचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास ६० हजार लोकांनी पाहिला आहे. ८ हजारहून जास्त लोकांनी या व्हिडीओला पसंती दिली आहे आणि या व्हिडीओवर रिएक्शन देत आहेत.

टॅग्स :दिलीप कुमारकोरोना वायरस बातम्याकुणाल कामरा