Join us  

'कुली नं.१' पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालणार, रिमेक चित्रपटाचं बँकॉकमध्ये शूटिंग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 2:20 PM

सध्या 'कुली नं-1' सिनेमाचे पोस्टर घेवून सारा आणि वरूण यांचे मिम्सही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

दिग्दर्शक डेविड धवन 'कुली नं-1' सिनेमा बनवणार असल्याची ब-याच दिवसापासून जोरदार चर्चा सुरू होती.अखेर  'कुली नं. 1'च्या रिमेकचे शूटिंग  बँकॉकमध्ये सुरू झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन करत आहेत.  या सिनेमाच्या  मुहूर्त क्लॅप त्यांची पत्नी करुणा धवनन दिला. चित्रपट पुढच्या वर्षी १ मे रोजी रीलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमात वरूण धवन आणि सारा अली खान झळकणार आहेत.'कुली नं- 1' सिनेमाचा हा सिक्वेल असला तरी वरूणची वेशभूषाही कुलीसारखी नसून तो नॉर्मल जीन्स आणि टी-शर्ट अशा पोशाखातच दिसणार आहे. सध्या 'कुली नं-1' सिनेमाचे पोस्टर घेवून सारा आणि वरूण यांचे मिम्सही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. तुर्तास 'कुली नं-1' चा ही सिक्वेल असला तरीही आजच्या काळाला अनुरूप ठरेल अशीच सिनेमाची कथा असणार असल्याचे डेविड धवन यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. 

 

१९९५ मध्ये प्रदर्शित झालेला 'कुली नं-1' सिनेमात गोविंदा, करिष्मा कपूर, कादर खान आणि शक्ती कपूरसारख्या कलाकारांच्या भूमिका होत्या. या सिनेमाला रसिकांची तुफान पसंती मिळवली होती. आजही कुली नंबर 1 आठवताच गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्यामधील असलेली केमिस्ट्री आजही डोळ्यासमोर उभी राहते. इतके वर्ष ओलांडली असली तरीही कुली नंबर - सिनेमाची जादू कमी झालेली नाही. त्यामुळे आता सिनेमाचा सिक्वेल बनत असल्यामुळे तीच लोकप्रियता या सिक्वलला मिळेल का हे पाहणे रंजक ठरणार आहे.

  

तुर्तास ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ सिनेमात वरूण धवन झळकणार आहे.हा चित्रपट ८ नोव्हेंबर २०१९ला प्रदर्शित होणार होता. पण मागच्याच महिन्यांत या चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटचा खुलासा झाला होता.चित्रपटाची रिलीज डेट ८ नोव्हेंबरवरून पुढील वर्षी २४ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. असे का? तर आता या कारणाचा खुलासा झाला आहे. सूत्रांचे मानाल तर वरूण धवनच्या लग्नामुळे ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली आहे. अर्थात खुद्द वरूण व वरूणचे पिता डेव्हिड धवन दोघेही ही गोष्ट नाकारत आले आहेत.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नामुळेच वरूणने ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ची रिलीज डेट पुढे ढकलण्याची मागणी दिग्दर्शक रेमो डिसुजाकडे केली होती. वरूणच्या विनंतीखातर रेमोने चित्रपटाची रिलीज डेट बदलली.

टॅग्स :वरूण धवन