Join us

कंफर्म सलमान खान करणार आयुष शर्माला लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 16:26 IST

गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खान आपला मेहुणा आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याच्या बऱ्याच चर्चा होत्या. मात्र यावर अधिकृतरित्या ...

गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खान आपला मेहुणा आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याच्या बऱ्याच चर्चा होत्या. मात्र यावर अधिकृतरित्या कोणीही काही बोलले नव्हते. मात्र आता ही गोष्ट खुद्द भाईजानने कंफर्म केली आहे. बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सलमानने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. सलमनाच्या म्हणण्यानुसार तो आयुषाला घेऊन एक चित्रपट तयार करतो आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मिनावाल करणार आहे.  याचित्रपटातून अभिराज त्याच्या करिअरची दिग्दर्शक म्हणून सुरुवात करणार आहे. अभिराजने या आधी अली अब्बास जाफरसोबत असिस्टेंट दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. अभिराजची सलमानसोबत ओळख सुल्तानच्या सेटवर झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार गेले तीन वर्षांपासून आयुष या प्रोजेक्टसाठी स्वत:ला तयार करतो आहे. बजरंगी भाईजान, प्रेम रतन धन पायो, सुल्तान आणि ट्युबलाईट सारख्या चित्रपटाच्यासेटवर आयुषने काम केले आहे.   सलमानचे म्हणणे होते या चित्रपटाची सुरुवात तेव्हाच केली जाईल जेव्हा आयुष यासाठी पूर्णपणे तयार असेल. आयुष याचित्रपटासाठी वर्कशॉप्स अटेंड करतो आहे. अजून चित्रपटातील अभिनेत्रीचे नाव फायनल केले गेले नाही आहे. मात्र दोन्ही मुख्य कलाकारांना वर्कशॉप्स व्दारे ट्रेनिंग दिली जाणार आहे.   पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. हा चित्रपट गुजरातच्या प्रेम कथेवर आधारित आहे. 2018 ला हा चित्रपट रिलीज होणार आहे.   ALSO READ :  एक किलोमीटर धावत येऊन सलमान खानने वाचविले होते दिया मिर्झाच्या आईचे प्राण!आयुष शर्मा हा सलमानची लाडकी बहिण अर्पिताचा नवरा आहे. दोघांना एक मुलगा सुद्धा आहे. ज्याचे नाव आहिल आहे. नेहमीच आपल्या भाच्यासोबतचे व्हिडिओ सलमान खान शेअर करत असतो. सलमान खान आयुषच्या अपोझिट मोनी रॉयचे नाव फायनल केले होते. मात्र आयुषने मौनीसोबत काम करण्यास नकार दिला. आयुषाला सारासोबत काम करण्याची इच्छा होती. मात्र साराने सुशांत सिंगसोबत केदारनाथमधून डेब्यू करण्यास पसंती दिली. त्यामुळे सलमान आता एका नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. जीला तो आयुष्याच्या अपोझिट चित्रपट घेईल.