राष्ट्रगीत प्रकरणी अमिताभ यांच्याविरूद्ध तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2016 18:47 IST
गत आठवड्यात टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारत-पाकिस्तान सामन्याआधी राष्ट्रगीत गाण्यासाठी ४ कोटी रूपयांचे मानधन घेतल्याचे वृत्त खुद्द महानायक अमिताभ बच्चन ...
राष्ट्रगीत प्रकरणी अमिताभ यांच्याविरूद्ध तक्रार दाखल
गत आठवड्यात टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारत-पाकिस्तान सामन्याआधी राष्ट्रगीत गाण्यासाठी ४ कोटी रूपयांचे मानधन घेतल्याचे वृत्त खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांना खोडून काढावे लागले होते. या बातमीची चर्चा विरते ना विरते तोच, आता यांच्याविरूद्ध नवी दिल्लीतील अशोक नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रगीतातील काही शब्दांचा चुकीचा उच्चार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राष्ट्रगीत ५२ सेकंदात संपले पाहिजे. मात्र अमिताभ यांनी राष्ट्रगीत म्हणण्यासाठी १ मिनिट २२ सेकंद इतका वेळ घेतला, असा आक्षेपही नोंदवण्यात आला आहे. ......................................................... राष्ट्रगीत गाण्यासाठी अमिताभ यांनी एक खोटा पैसाही घेतलेला नाहीकाल शनिवारी कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याआधी राष्ट्रगीत गाण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी ४ कोटी रुपए घेतल्याची बातमी सोशल मीडियावर आली आणि बघता बघता, अमिताभ यांच्या देशभक्तिवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाºया मॅसेजेचाही पूर आला... अमिताभ यांनी भारत-पाक सामन्याआधी गायलेले राष्ट्रगीत हाही एक ‘अभिनय’च होता, अशा स्वरूपाचे मॅसेज टिष्ट्वटरवर पडले. यावरून अनेक उलटसुलट चर्चेला ऊत आला. अमिताभ यावर काहीही बोलले नाहीत. पण बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुली यांनी मात्र यावर मौन तोडत अमिताभ यांच्याविरूद्ध प्रचार करणाºयांच्या सणसणीत थोबाडीत हाणली. अमिताभ यांनी राष्ट्रगीत गाण्यासाठी एक खोटा पैसाही घेतलेला नाही. आम्ही त्यांचे ऋणी आहोत,असे सौरभने स्पष्ट केले. ‘‘आम्ही अमिताभ यांना आमंत्रण दिले होते. पण याऊपरही अमिताभ स्वत:च्या पैशाने विमानाचे तिकीट काढून आले होते. हॉटेलचा खर्चही त्यांनी स्वत:च्या खिशातून केला. त्यांनी स्वत: ३० लाख रुपए खर्चून हे सादरीकरण केले. थोडे फार तरी पैसे घ्या, अशी विनंती करून आम्ही थकलो पण हे सर्व मी प्रेमापोटी केले, असे सांगत त्यांनी नम्रपणे पैसे घ्यायला नकार दिला. असे असताना काहीही माहिती नसताना एखाद्याविरूद्ध खोटे आरोप करणे चुकीचे आहे’’- सौरभ गांगुली,बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू