Join us  

कपिल शर्माचे इंस्टाग्रामवर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 6:18 PM

कपिलचा आगामी 'सन ऑफ मनजीत सिंह' हा पंजाबी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्दे 'सन ऑफ मनजीत सिंह' चित्रपट १२ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा गेल्या अनेक दिवसापासून सिनेइंडस्ट्रीतून गायब होता. त्याचे चाहते त्याची उत्सुकतेने वाट पाहत होते. 'द फॅमिली टाईम विद कपिल' या शोचे तीन भाग प्रसारित झाल्यानंतर तो फार कमी वेळा दिसून आला. यानंतर तो आता पुन्हा एकदा कमबॅक करणार असून नुकताच त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे तब्बल सात महिन्यानंतर त्याने पुनरागमन केल्याचे दिसून येत आहे.

कपिलचा आगामी 'सन ऑफ मनजीत सिंह' हा पंजाबी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या कपिल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या बिझी शेड्युलमधून थोडा वेळ काढत त्याने इंस्टाग्रामवर एक नवा फोटो शेअर केला आहे. कपिलने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो एका नव्या लूकमध्ये दिसत असून त्याने गॉगल लावला आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये त्याच वजन वाढल्याचे दिसून येत आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्येही त्याने वाढलेल्या वजनाबद्दल सांगितले आहे.  दरम्यान, कपिलचा 'सन ऑफ मनजीत सिंह' हा चित्रपट १२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून यात त्याने गुरप्रीत घुग्गी या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

गेल्या काही महिन्यांत कपिलचे वजन प्रचंड वाढले आहे. इतके की त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. हे वजन कमी करून पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या लूकमध्ये परतण्यास कपिल प्रयत्न करतोय. येत्या आॅक्टोबरपर्यंत पुन्हा एकदा टीव्हीवर दमदार वापसी करण्याचीही कपिलची योजना आहे. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, कपिल शमार्ला पुन्हा एकदा आपल्या आयुष्याची गाडी रूळांवर आणायची आहे. त्यामुळे त्याने आपल्या जीवनशैलीत अनेक बदल केले आहेत. आधीसारखा फिट होण्यासाठी तो प्रयत्न करतोय. यासाठी त्याने एक पर्सनल ट्रेनर हायर केला आहे.

टॅग्स :कपिल शर्मा