जुडवाच्या सेटवर तापसी आणि जॅकलीनमध्ये कोल्ड वॉर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 11:42 IST
एखाद्या चित्रपटात जेव्हा दोन अभिनेत्री एकत्र काम करत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये कॉल्ड वॉरच्या गोष्टी नेहमीच ऐकत असतो. बॉलिवूडच्या अनेक ...
जुडवाच्या सेटवर तापसी आणि जॅकलीनमध्ये कोल्ड वॉर
एखाद्या चित्रपटात जेव्हा दोन अभिनेत्री एकत्र काम करत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये कॉल्ड वॉरच्या गोष्टी नेहमीच ऐकत असतो. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींमधले कॉल्ड वॉर आपल्या नेहमीच कानावर येत असते. आता या यादीत आणखीन दोन नाव सामील झाली आहेत ती म्हणजे जॅकलीन फर्नांडिस आणि तापसी पन्नूच. या दोघी जुडवा 2 या चित्रपटात एकत्र काम करत आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता वरुण धवन ही आहे. लंडनमध्ये या चित्रपटाचे शूटिंग चालू होते त्यादरम्यान जॅकलीन आणि तापसी आपले सीन्स वेगळे वेगळे शूट करत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघींनी शूटिंग संपल्यावर एकमेंकींचे आभार सुद्धा मानले नाहीत. दोघींमधील हे कॉल्ड वॉर वाढू नये यासाठी दोघांनी एकही सीन किंवा चित्रपट एकत्र न करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघींच्या शूटिंगचे शेड्यूल ही वेगवेगळे लावण्यात यायचे की यांचा एकमेंकींशी सामना नाही होणार. या चित्रपटाची लंडनमधली शूटिंग पूर्ण झाली आहे आता लवकरच मुंबईत जुडवा 2ची शूटिंग सुरु होणार आहे. वरुण धवनची या चित्रपटात दुहेरी भूमिका आहे. यापूर्वीच्या चित्रपटात सलमान खानने ही दुहेरी भूमिका साकारली होती. यात करिष्मा कपूर आणि रंभा यांच्या भूमिका होत्या. रंभाची भूमिका जुडवा २ मध्ये तापसी पन्नू ही करीत आहे. याचित्रपटाची निर्माती साजिद नाडियादवाला करत आहेत दिग्दर्शन डेव्हिड धवन करत आहेत. 20 वर्षांनंतर येणाऱ्या या चित्रपटाचा सीक्वल सप्टेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तब्बल 20 वर्षांनंतर येणाऱ्या या चित्रपटाचे प्रेक्षकही वाट पाहत आहेत.