महिमाचा दावा : लिएंडरने मला प्रेमात धोका दिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 16:36 IST
महिमा चौधरी पुन्हा लाईम लाईटमध्ये आली आहे. ‘डार्क चॉकलेट’ या आगामी चित्रपटामुळे महिमा सध्या चर्चेत आहेच. पण त्याहीपेक्षा वैयक्तिक ...
महिमाचा दावा : लिएंडरने मला प्रेमात धोका दिला
महिमा चौधरी पुन्हा लाईम लाईटमध्ये आली आहे. ‘डार्क चॉकलेट’ या आगामी चित्रपटामुळे महिमा सध्या चर्चेत आहेच. पण त्याहीपेक्षा वैयक्तिक आयुष्यातील एक ‘रहस्य’ महिमाने उघड केले आहे. यामुळेही महिमा चर्चेत आली आहे. टेनिसपटू लिएंडर पेस याने प्रेमात धोका दिल्याचा दावा महिमाने केला आहे. महिमा दीर्घकाळ लिएंडरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. यानंतर दोघेही लग्नबंधनात अडकणार, अशी बातमी आली. पण त्याआधीच दोघांचेही ब्रेकअप झाले. या ब्रेकअपमागचे कारण महिमा वा लिएंडर या दोघांनीही कधीच उघड केले नाही. पण दीर्घकाळानंतर महिमाने तोंड उघडलेय. ‘लिएंडर निश्चितपणे एक चांगला टेनिसपटू आहे. पण माझ्यासोबत त्याने चांगले केले नाही. तो अन्य कुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, हे कळल्यावर मला अजिबात धक्का बसला नाही. तो माझ्या आयुष्यातून गेल्यावर मला काहीही फरक पडला नाही. उलट मी आणखी परिपक्तव झाले. मला वाटते, रिया पिल्लईसोबतही त्याने असेच केले असणार,’असे महिमा म्हणाली. महिमा लवकरच शीना बोरा हत्याकांडावर आधारित ‘डार्क चॉकलेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये परततेयं. आता त्यासाठी चर्चेत तर राहायलाच हवे ना??.