Join us  

ड्रग्ज तस्करी प्रकरणी अभिनेत्रीला अटक, समोर आला डोकं चक्रावणारा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 5:13 PM

दोन आठवड्यापासून भारतीय अभिनेत्री UAE च्या तुरुंगात आहे. आता या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे.

काही दिवसांपूर्वी 'सडक २' आणि 'बाटला हाऊस' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली बॉलिवूड अभिनेत्री क्रिसन परेरा ला  (संयुक्त अरब अमिरात)  UAE अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली आणि चर्चेला उधाण आलं. अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात ती गेल्या दोन आठवड्यांपासून तुरुंगात आहे. या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात तिला फसवून तिची अटक घडवून आणल्याचं समोर आलं आहे.

आता अभिनेत्री आणि तिच्या आईला फसवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हे दोन आरोपी परदेशात ड्रग्जची तस्करी करण्यासाठी लोकांचा वापर करत त्यांची फसवणूक करत असल्याचे समोर आलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा लोकांना परदेशात वेबसिरीज बनवत असल्याचे अश्वासन देते होते. यानंतर एखाद्या वस्तूमध्ये ड्रग्ज लपवून त्या व्यक्तीची मुंबईतून परदेशात पाठवणूक करत असे.  यानंतर आरोपी विदेशी ड्रग्स एजन्सीला याबद्दल माहिती देत असत. यानंतर परदेशात या व्यक्तींना अटक केली जात असे,

क्रिसन परेराला ही यात अडकवण्यात आलं आहे. पण सुदैवानं तिच्या आईनं योग्य वेळेत पोलिसांची मदत घेतल्यानं क्रिसनच्या सुटकेचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटीसडक 2