अशी सजलीयं करण जोहरच्या मुलांची खोली...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 13:27 IST
करण जोहर अलीकडेच बाप झाला. सरोगसीद्वारे दोन जुळ्या मुलांचे पालकत्व त्याने स्वीकारले. काल-परवाच करण आपल्या रूही व यश या ...
अशी सजलीयं करण जोहरच्या मुलांची खोली...!
करण जोहर अलीकडेच बाप झाला. सरोगसीद्वारे दोन जुळ्या मुलांचे पालकत्व त्याने स्वीकारले. काल-परवाच करण आपल्या रूही व यश या दोन मुलांना घरी घेऊन आला. रूही व यश यांच्यासाठी करणने खास रूम सजवलीय. या रूमची एक झलक तुम्हाला पाहायला मिळाली तर? होय, हे शक्य आहे. कारण खुद्द करणने त्याच्या मुलांच्या रूमचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यश आणि रुही घरी येण्याआधीच करणने त्यांच्यासाठी एक खास खोली तयार करुन घेतली आहे. ही खोली करणने खास डिझाईन करून घेतली गेली आणि ही जबाबदारी कुणी पार पाडली माहितीय? शाहरूख खानची बेटरहाफ गौरी खान हिने. होय, रूही व यश यांच्या खोलीच्या खास सजावटीची जबाबदारी करणने गौरीकडे सोपवली होती. गौरीनेही ही जबाबदारी अतिशय प्रेमाने निभावली. खोलीचे फोटो पाहता क्षणी त्याची जाणीव आपल्याला होते. यश व रूहीच्या खोलीमध्ये भडक रंग न वापरता शुभ्र पांढ-या रंगाचा वापर करण्यात आला आहे. यात सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहेत, ते म्हणजे कार्टून प्रिंट्स आणि काही खेळणी. एकंदर काय तर रूही व यशची रूम अगदी झक्कास सजलीय. करण मुलांच्या संगोपनात कुठलीही कसर सोडू इच्छित नाही, हेही यातून दिसतेय. ALSO READ : गौरी खानने सजवलेले रणबीरचे नवे घर तुम्ही पाहिलेयं का? गौरी खान इंटेरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रात एक मोठे नाव आहे. याआधी तिने अभिनेता रणबीर कपूरच्या नव्या घराचेही इंटेरिअर डिझायनिंग केले होते. त्यावेळी ऋषी कपूर यांनी गौरीची प्रशंसा करत तिच्या कलेला दाद दिली होती. तू घराला घर बनवले, वेल डन गौरी, असे ऋषी कपूर म्हणाले होते.