Join us

राब्ता चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाची कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 13:55 IST

सुशांत सिंग राजपूत आणि कृति सॅनन यांचा आगामी चित्रपट राब्ताच्या मागचे शुल्ककाष्ट काही संपण्याचे  नाव घेत नाही आहे. राब्तावर ...

सुशांत सिंग राजपूत आणि कृति सॅनन यांचा आगामी चित्रपट राब्ताच्या मागचे शुल्ककाष्ट काही संपण्याचे  नाव घेत नाही आहे. राब्तावर सेन्सॉर बोर्डाने कात्री फिरवली आहे. लवकरच रिलीज होणाऱ्या या चित्रपटावर अनेक कट लावण्यात आले आहेत. हे वाचून या चित्रपटाचे फॅन्स थोडेसे नाराज नक्कीच झाले असतील.  सेन्सॉर बोर्डाच्या काही अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात हा चित्रपट पाहिला आणि यातील काही सीन्स कट करण्याचा निर्णय घेतला.  सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार चित्रपटातील काही डायलॉग आणि सीन्स आपत्तीजनक आहेत. चित्रपटात काही अपशब्दांचा देखील वापरकरण्यात आला आहे ज्यावर अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत कात्री लावली आहे. राब्ताला जर यू/ ए सर्टिफिकेट हवे असेल तर चित्रपटातून अपशब्द काढावे लागतील अन्यथा राब्ताला फक्त ए सर्टिफिकेट देण्यात येईल. सुशांत आणि कृतिचे फॅन्स हे ऐकून नाराज होतील की चित्रपटातील सुशांत आणि कृतिच्या किसिंग सीनवरुन सुद्धा हरकत घेतली आहे.  राब्ता चित्रपटाची स्टोरी ही तेलगू चित्रपट मगधारीची कॉपी असल्याचा आरोप लावण्यात आला होता. मगधीरा चित्रपटाचे निर्माता अल्लु अरविंद यांनी यासंदर्भात हैद्राबाद कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच  'मैं तेरा ब्वॉयफ्रेंड' हे गाणे चोरल्याचा आरोपदेखील करण्यात आला होता. त्यामुळे चित्रपट रिलीज होण्याआधीच चित्रपटावर अनेक संकटांमध्ये अडकला आहे. 9 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीज आधी गेल्या काही दिवसांपासून सुशांत आणि कृतिच्या रिलेशनशीपबाबत चर्चा रंगली होती. त्यामुळे स्क्रीनवर त्यांची केमिस्ट्री बघण्यासाठी त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक असतील.