Join us

मुलाच्या मृत्यूने व्यथित झाली सेलिना जेटली; स्वत:ला सावरण्याचा करतेय प्रयत्न !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 20:53 IST

जुळ्या मुलांपैकी एकाचा मृत्यू झाल्याने सेलिना जेटली खूपच दु:खी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. अशात ...

जुळ्या मुलांपैकी एकाचा मृत्यू झाल्याने सेलिना जेटली खूपच दु:खी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. अशात मुलाचेही निधन झाल्याने, या दु:खातून स्वत:ला सावरणे सेलिनाला खूप अवघड होत आहे. दु:खात असलेल्या सेलिनाने म्हटले की, ‘हे खूपच अवघड आहे. वडिलांच्या निधनानंतर मी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करीत होती.’ दोन महिन्यांपूर्वीच सेलिनाच्या वडिलांचे निधन झाले. पुढे बोलताना सेलिनाने म्हटले की, ‘वडिलांच्या निधनानंतर मुलाचे निधन झाल्याने मी खूपच दु:खी झाले आहे. याविषयी बोलतानादेखील मनाला वेदना होतात.’सेलिनाने १० सप्टेंबर रोजी दुबई येथे जुळ्या मुलांना जन्म दिला होता. मात्र दोघांपैकी एकाचे हृदयाच्या गंभीर आजारामुळे निधन झाले. दरम्यान, आपले दु:ख व्यक्त करताना सेलिनाने सोशल अकाउंटवर लिहिले की, ‘आपण जसा विचार करतो तसे जीवन व्यतित करता येत नाही. माझा मुलगा शमशेर जेटली हाग या जगाचा प्रवास पूर्ण करू शकला नाही. मी माझे वडील आणि मुलगा शमशेर यांना संकेत देऊ इच्छिते की, गेले दोन महिने माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक राहिले आहेत.’ पुढे सेलिनाने लिहिले की, ‘एका अंधाºया गुफेनंतर प्रकाशाचे किरण असतात. जे आम्ही आर्थरच्या माध्यमातून बघणार आहोत. शमशेरकरिता खूपच भावुक होऊन सांत्वन व्यक्त करते अन् अपेक्षा करते की, हे दु:ख एक दिवस चांगल्या आठवणींमध्ये परावर्तीत होईल. तोपर्यंत माझ्या परिवारासाठी तुमचे आशीर्वाद हवे आहेत.’पीटर हाग याच्यासोबत विवाहबंधनात अडकलेल्या ३५ वर्षीय सेलिनाला विन्स्टन आणि विराज नावाचे पाच वर्षीय जुळी मुले आहेत. तिने दुसºयांदा जुळ्या मुलांना जन्म दिला होता. मात्र दुर्दैवाने त्यातील एकाचा मृत्यू झाला. माजी ब्यूटी क्वीन आणि मॉडेल तथा अभिनेत्री असलेल्या सेलिनाने २००१ मध्ये मिस इंडियाचा किताब पटकाविला होता. मिस युनिव्हर्स स्पर्धेतही ती चौथी रनरअप होती.