चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ही सेलिना जेटली जगतेय लॅव्हिश आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 15:40 IST
2003 मध्ये जानशीला चित्रपटातून सेलिना जेटलीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सेलिनाने वयाच्या 16 व्या वर्षी मॉडलिंगला सुरुवात केली. 2001 मध्ये ...
चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ही सेलिना जेटली जगतेय लॅव्हिश आयुष्य
2003 मध्ये जानशीला चित्रपटातून सेलिना जेटलीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सेलिनाने वयाच्या 16 व्या वर्षी मॉडलिंगला सुरुवात केली. 2001 मध्ये ती मिस इंडिया बनली होती. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या हिट चित्रपटात नो एंट्री, गोलमाल रिटर्न आणि हे बेबी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र करिअरमध्ये फारसे यश न मिळालेल्या तिने इंडस्ट्रीला बाय बाय केले. चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर ही सेलिना एक लॉविश आयुष्य जगते आहे. एका रिपोर्टनुसार सेलिनाकडे 1000 सँडल्स आहेत. सेलिनाने दुबईमधल्या एका बिझनेसमनशी लग्न केले आहे. सेलिनाचा नवरा पीटर हागशी पतीकडे अरबोंची संपत्ती आहे. सेलिनाने 10 सप्टेंबरला दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. मात्र त्यातील एक बाळाचे निधन झाले. त्यामुळे सेलिनावर दुखाचा डोंगर कोसळला होता. प्रेग्नंसी दरम्यान सेलिनाने तिच्या बेबी बंम्पचा फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले होते. काही दिवसांपूर्वीच सेलिनाच्या वडिलांचे देखील निधन झाले आहे. सेलिना याआधी दोन मुलंदेखील आहेत ज्यांची नाव विंस्टन आणि विराज आहेत. सेलिनाच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. मिळालेल्या माहितीनुसार सेलिना लवकरच चित्रपटांमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. LGBT राइट्सवर आधारित चित्रपटात ती दिसणार आहे. सेलिनाने कंफर्म केले की हा चित्रपट हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेत तयार करण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम चालू आहे.लहानपणी सेलिनाला सुद्धा सैन्य दलात भरती व्हायचे होते. डॉक्टर वा वैमानिक होण्याची तिची इच्छा होती. पण नियतीला वेगळेच काही मान्य होते. २००१ मध्ये सेलिना विश्वसुंदरी बनली आणि त्यानंतर बॉलीवूडचे दरवाजे तिच्यासाठी आपोआप उघडले.सन २००७ मध्ये सेलिना आपल्या ‘लव्ह हॅज नो लँग्वेज’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी न्यूझीलंडला गेली होती. या ठिकाणी भारतापासून तिचा कुणीतरी पिच्छा पुरवला. या घटनेने सेलिनाला मोठा मानसिक धक्का बसला होता.