Join us  

मोहन जोशींची CBI करणार चौकशी, जाणून घ्या सुशांतवर उपचार केल्याचा दावा करणारी कोण आहे ही व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 2:21 PM

मोहन जोशी यांनी मागील वर्षी सुशांतला डिप्रेशनमधून बाहेर काढल्याचा दावा केला आहे. 

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीबीआय चौकशी करत आहे. या प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाच्या चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. सुशांतच्या जवळच्या मित्रांची चौकशी करण्यात आली आहे. आता प्रकरणात आणखीन एक नवीन नाव समोर आले आहे. ज्याची सीबीआय चौकशी करणार आहे.हे नवीन नाव आहे मोहन जोशी. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार मोहन जोशी नामक व्यक्तीने दावा केला होता की मागील वर्षी ते सुशांत आणि रियाला भेटले होते. स्वतःला आध्यात्मिक उपचारक (स्पिरिचुअल हीलर) म्हणणारे मोहन जोशी यांनी दावा केला आहे की त्यांनी सुशांतला डिप्रेशममधून बरे केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहन जोशी ठाण्यात राहतात आणि बँकेतून रिटायर झालेले आहेत. ते दावा करतात की फक्त स्पर्शाने लोकांना बरे करतात. ते आपल्या हाताने रुग्णाला स्पर्श करतात आणि त्यांच्यातून उर्जा बाहेर येते. त्यातून रुग्ण बरा होतो.जोशी यांनी दावा केला आहे की मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये रिया आणि सुशांतने त्यांना भेटण्यासाठी संपर्क केला होता. त्यावेळी तो डिप्रेशनशी सामना करत होता. त्यानंतर ठाण्याती वॉटरस्टोन रिसॉर्टमध्ये सुशांत, रिया व मोहन जोशी यांची भेट झाली होतीय तिथे स्पर्शाच्या उपचारानंतर सुशांत डिप्रेशनमधून बाहेर पडला होता.

दरम्यान सीबीआय मोहन जोशीच्या कथित उपचारासंबधी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ते जोशी यांच्या ठाणे येथील निवासस्थानी मोहन जोशी यांना सुशांत व रियासोबतच्या मुलाखतीबद्दल चौकशी करणार आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्तीगुन्हा अन्वेषण विभाग