Join us  

सुशांत सिंग राजपूतप्रकरणाचा तपास करणाऱ्या CBIने केले मोठे वक्तव्य, म्हणाले- आम्ही कोणतीच...

By गीतांजली | Published: September 28, 2020 5:08 PM

सुशांतची बहीण प्रियंका आणि मीतूची चौकशी होणार आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजयूत याच्या मृत्युप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची चौकशी सीबीआय करते आहे. सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू आत्महत्या की हत्या याचा अद्याप खुलासा झालेला नाही. सीबीआयची टीम या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सातत्याने तपास करत आहे. सीबीआयने म्हटले की, आतापर्यंत कोणतीही शक्यता या प्रकरणातील आम्ही नाकारलेली नाही.  सुशांतच्या मृत्यूशी संबंधीत सर्व बाबी लक्षात घेता सीबीआय तपास करीत आहे.  सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाची चौकशी केली जाणार आहे. सुशांतची बहीण प्रियंका आणि मीतूची चौकशी होणार आहे. याआधी ही प्रियंका आणि मीतूची चौकशी करण्यात आली होती. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधील डॉक्टर तरुण यांची देखील चौकशी होणार आहे.

याप्रकरणी रिया चक्रवर्तीने आणि सुशांतच्या कुटुंबीयांना तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे सुशांतच्या कुटुंबीयांची आणि रिया दोघांची चौकशी होणार. सध्या रिया ड्रग्स प्रकरणात जेलमध्ये आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी तिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप लावला आहे. तर रियाना सुद्धा सुशांतच्या कुटुंबीयांवर त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप लावला आहे. 

बॉलिवूडमधील उगवत्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या सुशांत सिंह राजपूतने जून महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान सुशांतच्या मृत्यूबाबत संशय घेण्यात आला होता. तसेच सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली, असावी अशी शंकाही व्यक्त केली जात होती. त्याबरोबरच त्याच्या मृत्यूवरून राजकारणही पेटले आहे. 

सुशांतनंतर आता रियावरही येणार सिनेमा, पुस्तक आणि डॉक्युमेंट्रीही येणार?

सारा अली खानने सांगितलं सुशांतसोबत ब्रेकअपचं कारण, म्हणाली - 'तो लॉयल नव्हता'

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतगुन्हा अन्वेषण विभाग