Join us

गर्भावस्थेत कॅरेलचा रॅम्पवॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 15:55 IST

फॅशन जगतात सडपातळ आणि कमनीय बांधा अशी एखाद्या आदर्श मॉडेलची व्याख्या. पण मुंबईत झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये या व्याख्येलाच ...

फॅशन जगतात सडपातळ आणि कमनीय बांधा अशी एखाद्या आदर्श मॉडेलची व्याख्या. पण मुंबईत झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये या व्याख्येलाच फाटा देण्यात आला. एक गर्भवती मॉडेल ही शोमधील शोस्टॉपर होती. तिचं नाव आहे कॅरल ग्रेसियस. खरंतर मॉडेलिंग विश्वात कॅरेल ग्रेसियस हे मोठं नाव आहे. देशातील टॉप सुपरमॉडेलपैकी एक आहे कॅरल ग्रेसियस. तसेच छोट्या पडद्यावरील बिग बॉस या रिअलिटी शोमधील ती स्पर्धक होती. याशिवाय कॅरल वॉर्डरोब मालफंक्शनमुळेही चर्चेत होती. पण सध्या तिचे नवीन रु प पाहायला मिळाले. फॅशन विश्वात लग्न आणि मुले झाल्यावर मॉडेलचे करिअर संपते. पण कॅरलने लॅक्मे फॅशन वीकमध्ये तिच्या येणाºया बाळासह रॅम्पवॉक केले. फक्त रॅम्पवॉक नाही तर ती या शोस्टॉपर होती. तिचे हे रु प पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. रॅम्पवॉक दरम्यान कॅरलच्या चेहºयावर पूर्वीसारखाच आत्मविश्वास दिसला. गौरांग शाहने डिझाईन केलेल्या हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या साडीत तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले होते.