Join us  

ग्रँड मस्ती फेम ब्रुना अब्दुल्ला आहे ३८ आठवड्यांची गर्भवती, सोशल मीडियावर शेअर केले बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 3:08 PM

ब्रुनाने जुलै २०१८ साली बॉयफ्रेंड अॅलनसह साखरपुडा केला होता. त्यानंतर मे २०१९मध्ये दोघं लग्नाच्या बेडीत अडकले. खासगी पद्धतीने दोघांनी विवाह केला होता.

ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री ब्रुना अब्दुल्ला सध्या आपल्या प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ब्रुनाने आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. आता ब्रुना सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ब्रुनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ब्रुना ३८ आठवड्यांची गर्भवती असून तिची डिलिव्हरी सप्टेंबर महिन्यात अपेक्षित आहे. बेबी बंप किती सुंदर दिसत आहेत असं कॅप्शन ब्रुनाने या फोटोला दिले आहे. या फोटोंमध्ये ब्रुना फारच सुंदर दिसत आहे. ब्रुनाने जुलै २०१८ साली बॉयफ्रेंड अॅलनसह साखरपुडा केला होता. त्यानंतर मे २०१९मध्ये दोघं लग्नाच्या बेडीत अडकले. खासगी पद्धतीने दोघांनी विवाह केला होता. 

लग्न म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट या कागदाचे तुकडे नव्हेत. दोन व्यक्तींना एकत्र ठेवण्यासाठी हे कागद पुरेसे नसल्याचे ब्रुनाने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. ब्रुना 'आय हेट लव स्टोरी' आणि 'ग्रँड मस्ती' या चित्रपटांमध्ये झळकली होती. याशिवाय 'खतरों के खिलाडी', 'डान्सिंग क्वीन', 'नच बलिये-६' मध्येही ब्रुना पाहायला मिळाली होती.

विशेष म्हणजे लग्न न करता ब्रुनाने पहिल्या बाळाला जन्म दिला होता. त्यावेळी तिने म्हटले होते की, आपण मुलाला लग्न न करता आपण जन्म देणार आहोत याची तिला अजिबातच पर्वा नाहीये. लग्नाच्या आधी आई बनण्यावर ब्रुनाचे म्हणणे आहे की, एका कागदाच्या तुकड्यावर सही करून लग्नाद्वारे दोन व्यक्ती एकत्र येतात. पण लग्नानंतर देखील अनेक लोक घटस्फोट घेत असल्याचे पाहायला मिळते. मात्र लग्न न करता देखील अनेक जोडपी खुश असतात. कोणतेही नाते टिकवण्यासाठी केवळ प्रेमाची गरज असते. पण त्याचसोबत लग्न हे प्रेमाचे प्रतीक असल्याचे देखील ती मान्य करते. 

टॅग्स :ब्रुना अब्दुल्लाह