Bright Award at Peninsula Grand Hotel
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 17:55 IST
नुकताच ब्राइट आउटडोअर मीडिया आयोजित एक अॅवॉर्ड सोहळ्यात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ऋतिक रोशन ही या ठिकाणी आपल्या कूल अंदाजात अवतरला होता.
Bright Award at Peninsula Grand Hotel
नुकताच ब्राइट आउटडोअर मीडिया आयोजित एक अॅवॉर्ड सोहळ्यात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ऋतिक रोशन ही या ठिकाणी आपल्या कूल अंदाजात अवतरला होता. ऋतिकने यावेळी घातलेल्या व्हाइट कलरच्या जॅकेटमध्ये तो भलताच कूल दिसत होता. या अॅवॉर्ड सोहळ्यात विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. ब्राइट आउटडोअर मी़डियाचे योगेश लखानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा हेही याठिकाणी उपस्थिती लावली होती. रणबीर कपूर जेंटलमेंटवाल्या लूकमध्ये अवतरला होता. यात तो खपूच हँडसम दिसत होता. सोनाली कुलकर्णी ट्रडिंशनल अंदाजात अॅवॉर्ड सोहळ्यात अवतरली होती. डेझी शहा इंडो वेस्टर्न स्टाइलमध्ये आली होती. यावेळी सोनाली कुलकर्णी आणि डेसी शहा यांच्या गप्पा रंगल्या होत्या. गुल पनाग सिंपल लूकमध्ये दिसली. अभिषेक बच्चनने डॅशिंग अंदाजात एंट्री घेतली. सोनू सूदचा कुंग फू योगा हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. सोनू सूदही अॅवॉर्ड सोहळ्यात हजेरी लावली होती. क्रिकेटमध्ये जबरदस्त कमबॅक केलेल्या युवराज सिंग याठिकाणी दिसला.