Join us  

Bridal Shower : होणाऱ्या सासूबाईसोबत धम्माल नाचली प्रियांका चोप्रा! पाहा, इनसाईड व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 12:44 PM

प्रियांकाच्या या ब्राईडल शॉवर पार्टीचे काही फोटो तुम्ही पाहिलेच. आता या पार्टीचे काही इनसाईड फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास लवरकच लग्न बंधनात अडकणार आहेत. या लग्नाची तयारी सुरु झाल्याची बातमी आम्ही, कालचं तुम्हाला दिली होती. लग्नाची तारीख अद्याप गुलदस्त्यात असली तरी प्रियांका व निकच्या लग्नाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. अलीकडे प्रियांकासाठी खास ब्राईडल शॉवर पार्टी अरेंज केली गेली. प्रियांकाच्या या ब्राईडल शॉवर पार्टीचे काही फोटो तुम्ही पाहिलेच. आता या पार्टीचे काही इनसाईड फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

पार्टीचा एक व्हिडिओ तर बघण्यासारखा आहे. होय, या व्हिडिओत प्रियांका आपल्या होणाºया सासूबार्इंसोबत धम्माल डान्स करताना दिसतेय. याशिवाय प्रियांकाची आई मधु चोप्राही या व्हिडिओत दिसत आहेत.

या पार्टीत प्रियांकाचे अतिशय जवळचे मित्र सहभागी झालेत. पांढºया रंगाची डिप नेक गाऊन घालून प्रियांका या पार्टीत सहभागी झाली होते.

प्रियांका व निकच्या लग्नाची तारीख अद्याप जाहिर करण्यात आलेले नाही. पण हे मेड टू बी कपल येत्या डिसेंबर महिन्यात लग्न करणार, असे कळतेय. प्रियांका व निक दोघेही आपले लग्न यादगार बनवू इच्छितात. त्यामुळेच दोघींनीही आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे.

आता हे लग्न किती ग्रँण्ड होईल, याची कल्पनाचं न केलेली बरी. प्रियांका व निक दोघेही हवाईमध्ये लग्न करू शकतात. प्रियाका व निक दोघांनाही मीडिया आणि गर्दीपासून दूर एक खासगी सोहळा हवा आहे. ग

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास