Join us

BOX OFFICE : कमाईच्या ‘रेस’मध्ये सलमान खान सर्वात पुढे, जाणून घ्या ‘रेस-३’ची दोन दिवसांची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2018 17:39 IST

ईदनिमित्त बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या प्रदर्शित झालेल्या ‘रेस-३’ने बॉक्स आॅफिसवर कमाईचे एक नवे रेकॉर्ड केले आहे. जबरदस्त अ‍ॅक्शन आणि ...

ईदनिमित्त बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या प्रदर्शित झालेल्या ‘रेस-३’ने बॉक्स आॅफिसवर कमाईचे एक नवे रेकॉर्ड केले आहे. जबरदस्त अ‍ॅक्शन आणि मल्टीस्टारर असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २९.१७ कोटी रुपयांची कमाई केली. तसेच यावर्षी पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचे रेकॉर्डही नावे केले. दुसºया दिवशी तर चित्रपटाने कमालच केली. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शच्या मते, शनिवारी चित्रपटाने ३८.१४ कोटी रुपयांचे विक्रमी कलेक्शन केले. त्यामुळे केवळ दोनच दिवसात चित्रपटाने ६७.३१ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे.  बॉलिवूड सुपरस्टार सलमानने पुन्हा एकदा आपले स्टारडम दाखवून दिले आहे. वास्तविक ‘रेस-३’ला समीक्षकांकडून फारशा चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत. अनेकांनी तर चित्रपट निर्मितीचाही खर्च वसूल होणार नसल्याचा दावा केला होता. परंतु ज्यापद्धतीने दोन दिवसामध्ये चित्रपटाने कमाई केली, त्यावरून आगामी काळात चित्रपटाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने कलेक्शनचा आकडा ४० कोटींच्या वर जाण्याची शक्यता आहे.  दरम्यान, सलमानच्या ‘बजरंगी भाईजान, सुलतान आणि टायगर जिंदा है’ या तीन चित्रपटांनी केवळ तीनच दिवसांमध्ये शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले आहे. ‘रेस-३’चे कलेक्शन पाहता हा चित्रपटही तिसºयाच दिवशी शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविण्याची शक्यता आहे. वास्तविक या चित्रपटाला लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. मात्र सलमानच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरताना दिसत आहे. चित्रपटात सलमान व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, बॉबी देओल, डेजी शाह, साकिब सलीम यांसारखी मोठी स्टारकास्ट मंडळी आहे. चित्रपटाला रेमो डिसूझाने दिग्दर्शित केले असून, रमेश तौरानी त्याचे निर्माता आहेत.