Join us

Box Office : ​‘काला’ने तीनचं दिवसांत कमावला १०० कोटींचा गल्ला!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 16:17 IST

रजनीकांत यांच्या ‘काला’ या चित्रपटाची सध्या बॉक्सआॅफिसवर धूम सुरु आहे. होय, केवळ तीन दिवसांत या चित्रपटाने जगभरात १०० कोटी ...

रजनीकांत यांच्या ‘काला’ या चित्रपटाची सध्या बॉक्सआॅफिसवर धूम सुरु आहे. होय, केवळ तीन दिवसांत या चित्रपटाने जगभरात १०० कोटी रूपये कमावले आहेत.  भारतातीलचं नाही तर जगभरातील प्रेक्षकांनी रजनीकांत यांच्या या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. बॉक्सआॅफिसवरचा गल्ला पाहता, याचा अंदाज सहज येईल.पहिल्या दिवशी चेन्नईवगळता या चित्रपटाने फासशी कमाई केली नाही. पण दुस-या व तिस-या दिवशी चित्रपटाच्या कमाईत एकदम वाढ दिसली. गत तीन दिवसांत केवळ चेन्नईत या चित्रपटाने ४़९ कोटी रूपये कमावले. अमेरिकन बॉक्सआॅफिसवर चित्रपटाने ६़ ८३ कोटींचा बिझनेस केला. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, आॅस्ट्रेलियात हा चित्रपट ‘पद्यावत’नंतरचा  ‘हायेस्ट ओपनर’ ठरला आहे. म्युझिक आणि सॅटेलाईट राईट्स विकून आधीच या चित्रपटाने २३० कोटी रूपये कमावले आहेत. आता हा चित्रपट आणखी किती घोडदौड करतो, ते बघूच.‘काला’ या चित्रपटात समुथिरकानी, अंजली पाटील, शिवाजी शिंदे आणि पंकज त्रिपाठी यांसारख्या बड्या कलाकारांच्या भूमिका आहेत. रजनीकांत यांच्या चाहत्यांना गेल्या काहीकाळापासून ‘काला’ या चित्रपटाची आतुरता लागून होती. या चित्रपटात रजनीकांत गरिबांचे ‘मसीहा’ म्हणून दाखविले गेले आहे.  ‘शिवाजी द बॉस’ आणि ‘कबाली’ या चित्रपटातही त्यांचा असाच काहीसा अंदाज बघावयास मिळाला होता. अशात ‘काला’हा चित्रपटही त्यांच्या चाहत्यांसाठी परफेक्ट ट्रीट ठरला आहे. धनुष निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पा. रंजित यांनी केले आहे. रजनीकांत यांच्यासोबत त्यांचा हा दुसरा चित्रपट आहे. या अगोदर त्यांनी २०१६ मध्ये आलेल्या ‘कबाली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.   ‘काला’ या चित्रपटाला संतोष नारायण यांनी संगीत दिले आहे. ALSO READ :रजनीकांत यांचा ‘काला’ प्रदर्शित! पहाटे चारच्या शोला तुफान गर्दी!!याआधी ‘काला’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. बुधवारी न्यायालायने याचिका फेटाळल्याने चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता. के.एस. राजशेखरन यांनी काला सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्यास सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने यास नकार दिला आहे. याचिकाकर्त्याने 'काला' सिनेमातील गाणी आणि काही दृश्यांवर आक्षेप नोंदवला आहे. सुनावणीदरम्यान कोर्टाने सांगितले की, तुम्ही सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी करत आहात, मात्र प्रत्येक सिनेरसिक सिनेमा पाहण्यास आतुर आहे.