दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा पटकावला हा किताब
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 17:06 IST
अभिनेत्री दीपिका पीदुकोण सध्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दीपिकाच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खूशखबर आहे. दीपिकाने पुन्हा एकदा ‘सेक्सिएस्ट ...
दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा पटकावला हा किताब
अभिनेत्री दीपिका पीदुकोण सध्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दीपिकाच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खूशखबर आहे. दीपिकाने पुन्हा एकदा ‘सेक्सिएस्ट वुमन अलाईव्ह’चा बहुमान पटकावला आहे. दीपिकाने २००७ मध्ये ‘ओम शांती ओम’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले. आपल्या सौंदर्याने दीपिकाने आतापर्यंत अनेकांना घायाळ केले आहे. पद्मावती चित्रपट ती राणी पद्मावतीची भूमिका साकारते आहे. खरे तर राणी पद्मावती म्हणजे जगातील सर्वाधिक सुंदर महिला. तिचे किस्से आजही चित्तोडगडमध्ये ऐकवले जातात. आजही येथील लोकगीतांमध्ये महाराणी पद्मिनी उर्फ पद्मावती जिवंत आहे. महाराणी पद्मिनीला चित्तोडगडमध्ये देवीच्या रूपात पुजले जाते. ALSO RAED : मस्तानी दीपिका पादुकोणचे हे रहस्य तुम्हाला माहीत आहे काय? वाचून बसेल धक्का!राणी पद्मावतीची भूमिका साकारण्यासाठी दीपिकाने 12 कोटींचे मानधन घेतल्याचे कळते. दीपिकाने या चित्रपटात तब्बल २० किलोचे दागिने अंगावर चढविले आहेत. त्याचबरोबर तिने जे कपडे घातलेले आहेत, तेदेखील खूप वजनदार आहेत. राणी पद्मावतीचा पती चित्तौडचा राजा रावल रत्न सिंगचा भूमिकेत झळकणार आहे. त्याचबरोबर रणवीर सिंगअल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत झळकणार आहे. रणवीर सिंग या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला १ डिसेंबर २०१७ रोजी येणार आहे. हा संजय लीला भन्साळी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या चित्रपट आधी नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. नुकताच दीपिकाने पद्मावतीबाबतचा तिचा अनुभव शेअर केला. भन्साळी हे माझ्यासाठी निश्चितपणे लकी आहेत. त्यांच्यासोबत ‘पद्मावती’ हा माझा तिसरा चित्रपट असणार आहे. भन्साळींसोबत तिसºयांदा काम करण्याची संधी मिळणे, हे मी माझे भाग्य समजते. पण खरे सांगायचे तर ‘पद्मावती’तील माझी भूमिका माझ्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपैकी सर्वाधिक यादगार भूमिका राहिली. पण ‘पद्मावती’मुळे मी खरचं खूप थकलेय. या सिनेमाने मला कधी नव्हे इतके थकवले. आम्ही सात आठ महिने न थांबता काम केले, असे तिने सांगितले. आता इतकी थकल्यानंतर दीपिकाला एक ब्रेक तर हवाच. ‘पद्मावती’च्या रिलीजनंतर दीपिका एक मोठ्ठा ब्रेक नक्की घेणार, हे यावरून समजून जावे.