Join us  

बोनी कपूर यांनी शेअर केले जान्हवीचे अनसीन फोटो, म्हणाले - तुझ्यात दिसते आईची छबी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 12:34 PM

जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर यांनी श्रीदेवीसोबतचे जान्हवीच्या बालपणीचे अनसीन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

जान्हवी कपूरने काल म्हणजेच ६ मार्चला २३वा वाढदिवस साजरा केला. या स्पेशल दिवशी जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी श्रीदेवीसोबत जान्हवीच्या बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोसोबत बोनी कपूर यांनी एक स्पेशल नोट देखील लिहिली आहे.

बोनी कपूर यांनी ट्विट करत जान्हवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले की, जेव्हा मी तुला कुशीत घेत होतो, तेव्हा मी तुझ्या डोळ्यात पाहायचो तेव्हा ते महासागरासारखे वाटायचे. आज तू अशी एक मुलगी बनली आहेस जी आतून आणि बाहेरून सुंदर आहे. जी आपल्या आईची छबी आहे. मला तुझा वडील असल्याचा खूप अभिमान वाटतो. हॅप्पी बर्थडे बेटा.. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि नेहमीच असेल. 

दोन वर्षांपूर्वी श्रीदेवीने जान्हवीच्या वाढदिवसादिवशी खूप सुंदर पोस्ट लिहिली होती. तिने जान्हवीच्या बालपणीचे फोटो कोलाज करून शेअर केले होते. या फोटोंमध्ये श्रीदेवी जान्हवीला केक भरवताना आणि वडीलांसोबत मस्ती करताना दिसते आहे. हे फोटो आजही भावूक करतात. श्रीदेवी भलेही आज या जगात नाही आहे पण, तिचे सोशल मीडियावरील अकाउंट आजही एक्टिव्ह आहे.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने धडक चित्रपटातून करियरची सुरूवात केली आहे.

या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतूक झाले आहे. मात्र जान्हवीला आजही एका गोष्टीची खंत वाटते की रुपेरी पडद्यावर तिला काम करताना पाहण्याची इच्छा असणारी तिची आई तिचे काम रुपेरी पडद्यावर पाहू शकली नाही.

टॅग्स :जान्हवी कपूरधडक चित्रपटबोनी कपूर