Join us  

बोनी कपूर यांनी लेकीसाठी शोधलंय उत्तम स्थळ, कोण असेल जान्हवीचा पती? म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 12:04 PM

जान्हवीच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूरची लाडकी मुलगी जान्हवी कपूर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. आता सध्या जान्हवीच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. नुकते एका मुलाखतीत जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी लाडकी लेक जान्हवीच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. बोनी कपूर यांनी जान्हवीसाठी एका खास मुलाची निवड केली आहे. 

जान्हवी प्रसिद्ध बिझनेसमन शिखर पहाडिया (shikhar pahariya)  याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. आता बोनी कपूर यांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे. नुकतेच बोनी कपूर यांनी झूमला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी जान्हवी आणि शिखर एकत्र असल्याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, 'शिखर हा मला प्रचंड आवडतो. तो जेव्हा जान्हवीसोबत नव्हता तेव्हापासून मी त्याला ओळखतो आहे. मी आणि शिखर चांगले मित्र आहोत’.

पुढे ते म्हणाले, 'जान्हवी आणि शिखर रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर त्यांच्यात भांडणे झाली पण ते पुन्हा एकत्र आले. शिखर कधीच जान्हवीला सोडून जाणार नाही.  दोघांचं नातं आयुष्यभरासाठी आहे. जान्हवी – शिखर यांच्यामध्ये मैत्री आहेच आणि प्रेमही प्रचंड आहे. शिखर माझ्यासाठी कायम कोणत्याही प्रसंगी धावत येतो. जान्हवी, खुशी, अर्जुन, अंशुला यांच्यासोबत शिखरचे चांगले संबंध आहेत. सगळ्यांना शिखर आवडतो'. 

दरम्यान, अलिकडेच जान्हवीने तिचा २७ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिने तिरुपतीमधील तिरुमाला मंदिराचं दर्शन घेतलं. यावेळी शिखरदेखील तिच्यासोबत होता. सध्या बोनी कपूर त्यांच्या मैदान या सिनेमाच्या रिलीजच्या तयारीत आहेत. तर जान्हवी 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी', 'मिस्टर अँड मिसेज माही', 'उलझन', 'आरसी 16' आणि 'देवारा: पार्ट 1' या सिनेमांमध्ये झळकणार आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूरसेलिब्रिटीबॉलिवूडबोनी कपूर