Join us  

बॉलिवूडचे अंडरवर्ल्ड कनेक्शन; दाउद इब्राहिमसोबत रिलेशनमध्ये होती अभिनेत्री मंदाकिनी, मग झाली या अभिनेत्रीची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 12:09 PM

अभिनेत्री मंदाकिनी आणि दाउद यांच्या अफेअरची एकेकाळी खूप चर्चा झाली होती. मात्र मंदाकिनीनंतर दुसरी अभिनेत्री दाउदच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांच्या नात्याला पूर्णविराम लागल्याचे बोलले जाते. 

 

 

बॉलिवूडच्या कलाकारांचेदेखील अंडरवर्ल्डसोबत नातेसंबंध राहिलेले आहेत. इतकंच नाही तर काही अभिनेत्रींना आपले करियर पणाला लावत अंडरवर्ल्डच्या डॉनच्या प्रेमातदेखील पडल्या होत्या. अभिनेत्री मंदाकिनी आणि दाउद यांच्या अफेअरची एकेकाळी खूप चर्चा झाली होती. मात्र मंदाकिनीनंतर दुसरी अभिनेत्री दाउदच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांच्या नात्याला पूर्णविराम लागल्याचे बोलले जाते. अभिनेत्री मंदाकिनीने वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मंदाकिनीचे खरे नाव आहे यास्मिन जोसेफ. या यास्मिनला खरी ओळख मिळाली ती राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमाने. या चित्रपटातील तिने दिलेल्या बोल्ड सीनची आजही चर्चा होते. पहिला चित्रपट सुपरहिट ठरल्यामुळे मंदाकिनीला बॉलिवूडमधून मोठ्या दिग्दर्शकांकडून चित्रपटासाठी ऑफर येऊ लागल्या. त्यानंतर तिने भरपूर चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचा दुसरा चित्रपट एवढा हिट नव्हता जेवढा तिचा पहिला चित्रपट सुपरहिट होता तरी देखील प्रेक्षकांनी तिला भरपूर प्रतिसाद दिला.

'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातील अभिनेत्री मंदाकिनीला 1994-95 साली दुबईतील शारजाहमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत पाहिले होते. दोघांचे फोटो व कित्येक कथा चर्चेत आल्या होत्या. मात्र मंदाकिनी हिने नेहमीच या वृत्ताना दुजोरा दिला नाही. मात्र 1996 साली प्रदर्शित झालेला चित्रपट जोरदारसोबत तिचे करियर संपुष्ठात आले. असेही बोलले जाते की दाऊदमुळेच मंदाकिनीला सिनेमात काम मिळत होते. बदनामीमुळे तिला काम मिळणं कमी झाले होते.

मंदाकिनीनंतर दाउदचे पाकिस्तानी अभिनेत्री अनिता अयुबसोबत अफेअर होते. दाऊद आणि अनिताचं अफेअर एका धक्कादायक घटनेनंतर सगळ्यांसमोर आले. सिनेनिर्माता जावेद सिद्दीकीची हत्या झाली, यामागे कारण होते अनिताला त्याच्या चित्रपटात घेण्यास दिलेला नकार. सध्याही दाऊच पाकिस्तानाच असण्याच्या चर्चांसमवेत त्याचे आणखी एक प्रेमप्रकरण आणि पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयातसोबत असणारे नाते समोर आले आहे.

टॅग्स :दाऊद इब्राहिममंदाकिनी