बॉलिवूडचे न्यू ईअर सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:19 IST
बहुतांश बॉलिवूड स्टार्स सध्या सुट्यांच्या मूडमध्ये आहेत. ख्रिसमसपासून सुरू झालेले हे सेलिब्रेशन न्यू ईअरपर्यंत अगदी दणक्यात झाले. आमिर खान- ...
बॉलिवूडचे न्यू ईअर सेलिब्रेशन
बहुतांश बॉलिवूड स्टार्स सध्या सुट्यांच्या मूडमध्ये आहेत. ख्रिसमसपासून सुरू झालेले हे सेलिब्रेशन न्यू ईअरपर्यंत अगदी दणक्यात झाले. आमिर खान- किरण राव, सैफ अली खान - करिना कपूर, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, विराट कोहली, मंदिरा बेदी यांनी परदेशात न्यू ईअर सेलिब्रेशन साजरे केले. तर शाहरुख, सलमान, अक्षय कुमार यांनी आपर्आपल्या घरीच नवीन वर्षाचे स्वागत केले. सलमान खानच्या कुटुंबीयांनी सलमानसाठी खास सेलिब्रेशन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडचे मोठे चेहरे सहभागी झाले. सलमानच्या या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अक्षय कुमार आपल्या मॅरेज अँनिव्हर्सरित बिझी असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे त्याची पार्टी खास असावी असा अंदाज लावला जात आहे. याच मालिकेत हॉट सनी लिओनीने आपल्या नवर्यासोबत न्यू ईअर सेलिब्रेशनचा फोटो अपडेट केला आहे. सोनम कपूरने मालदिवमध्ये आपल्या फ्रेंडस्सोबत न्यू ईअर सेलिब्रेट केले.