Join us  

नुसरत जहाँचा बाळाचा फर्स्ट लूक; व्हिडीओ शेअर करत दाखवली पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 11:20 AM

Nusrat jahan: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या नुसरतने तिच्या बाळाचा म्हणजेच यीशानचा पहिला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये यीशान छान खेळतांना दिसत आहे.

बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच तिने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला असून या बाळाविषयी अनेक पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र, अजूनपर्यंत तिने तिच्या बाळाचा चेहरा कोणालाही दाखवला नव्हता. त्यामुळे नुसरतच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. विशेष म्हणजे चाहत्यांची ही उत्सुकता पाहता नुसरतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या चिमुकल्या बाळाचा पहिला झलक शेअर केलाी आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या नुसरतने तिच्या बाळाचा म्हणजेच यीशानचा पहिला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये यीशान छान खेळतांना दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ नुसरतच्या एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला होता. तोच नुसरतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. 

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर नुसरतच्या या चिमुकल्या बाळाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये यीशानचा चेहरा फारसा स्पष्ट दिसत नसला तरीदेखील त्याने जांबळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. आणि, तो एका दुसऱ्या लहान मुलासोबत खेळत आहे.

टॅग्स :नुसरत जहाँसेलिब्रिटीसिनेमा