Join us  

Miss india: 'हा' ठरला सुष्मिताचं नशीब पालटवणारा प्रश्न; ऐन स्पर्धेत ऐश्वर्यावर केली मात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 1:41 PM

Sushmita sen: सुश्मिता आणि ऐश्वर्या राय बच्चन या दोघींनीही त्यांच्या सौंदर्याच्या जोरावर देशाचं नाव उंच केलं आहे. मात्र, त्यांच्यामधील एक खास गोष्ट फार कमी जणांना माहित आहे.

मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावावर करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुश्मिता सेन (susmita sen). आपल्या सौंदर्याच्या जोरावर ही स्पर्धा जिंकत सुश्मिताने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. आज त्याच लोकप्रिय अभिनेत्रीचा वाढदिवस. विशेष म्हणजे सुश्मिता आणि ऐश्वर्या राय बच्चन या दोघींनीही त्यांच्या सौंदर्याच्या जोरावर देशाचं नाव उंच केलं आहे. मात्र, त्यांच्यामधील एक खास गोष्ट फार कमी जणांना माहित आहे. या दोघींनी १९९४ साली 'मिस इंडिया' स्पर्धेत सहभाग घेतला होता. पण, सौंदर्यासोबतच तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर सुश्मिताने ही स्पर्धा जिंकली. परंतु, ही स्पर्धा ऐश्वर्या जिंकणार असं अनेकांना वाटत असतानाच सुश्मिताने बाजी मारली होती.

ऐश्वर्याच्या सौंदर्याची चर्चा केवळ देशातच नव्हे तर सातासमुद्रापारही केली जाते. त्यामुळे जेव्हा ऐश्वर्याने १९९४ मध्ये  मिस इंडियामध्ये सहभाग घेतला होता. तेव्हा अनेक स्पर्धकांनी भीतीपोटी त्यांचं नाव मागे घेतलं होतं. विशेष म्हणजे सुश्मिताच्या मनातही नाव मागे घेण्याचा विचार आला होता. परंतु, आईच्या सांगण्यावरुन सुश्मिता या स्पर्धेत टिकून राहिली. सुश्मिता केवळ या स्पर्धेत टिकलीच नाही तर तिने ऐश्वर्याचा पराभव करत ही स्पर्धाही जिंकली. 

मिस इंडिया या स्पर्धेसाठी ऐश्वर्या आणि सुश्मिता या दोघी प्रबळ दावेदार मानल्या जात होता. परंतु, या स्पर्धेत ऐश्वर्याच विजयी होणार असं अनेकांना वाटत होतं. मात्र, एका प्रश्नामुळे सुश्मिताचं नशीब पालटलं आणि तिने मिस इंडियाचा किताब जिंकला.

 मिस इंडियाच्या शेवटच्या फेरीत सुष्मिता आणि ऐश्वर्या यांच्यात टाय झाला होता. परिक्षकांनी दोघींनाही 9.33 नंबर दिले होते. परंतु, टाय झाल्यामुळे या दोघींना एक-एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नांमध्ये सुश्मिताचं उत्तर परिक्षकांना जास्त भावल्यामुळे सुश्मिता १९९४ ची मिस इंडिया ठरली. 

"जर तुला पतीच्या चांगल्या गुणाबाबात विचारलं तर तू 'द बोल्ड'मधील  Ridge Forrester आणि 'सांता बरबरा'मधील Mason Capwell या दोनपैकी कोणत्या कॅरेक्टर प्राधान्य देशील", असा प्रश्न ऐश्वर्याला विचारण्यात आला होता. त्यावर ऐश्वर्याने  'Mason Capwell' हे उत्तर दिलं होतं. त्यानंतर सुश्मिताला भारताच्या वस्त्रोद्योगाविषयी प्रश्न विचारला गेला होता. 

''पोशाखाचा वारसा महात्मा गांधींच्या काळापासून सुरू झाला". या प्रश्नाचे सुश्मिताने दिलेलं उत्तर परिक्षकांना विशेष आवडलं. त्यामुळे या पुरस्कार सुश्मिताच्या नावे करण्यात आला.

टॅग्स :सुश्मिता सेनऐश्वर्या राय बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटी