Join us  

बॉलिवूडच्या या गायक-अभिनेत्याला ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 7:00 PM

हा अभिनेता गायक बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडीचे बादशाब मेहमूद यांचा मुलगा आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे

हा अभिनेता गायक बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडीचे बादशाब मेहमूद यांचा मुलगा आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. नुकताच त्याने आपला 61 वा बर्थ डे सेलिब्रेट केला आहे. आम्ही बोलतोय, गायक-अभिनेता लकी अलीबाबत. लकी अलीने 1970 ते 1980 च्या दशकात सिनेमांमध्ये देखील काम केले होते.

पण लकी अली त्याच्या प्रोफेशनल लाईफ पेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत राहिला. लग्नाच्या बाबतीत म्हणाल तर त्याची तीन लग्ने झालीत. मेघन जेन मकक्लियरी हिच्यासोबत लकीने पहिले लग्न केले. तिने लकीच्या ‘सुनो’ या अल्बममध्ये काम केले होते. मेघन व लकीला दोन मुले झालीत. पण नंतर या दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर लकीने इनायासोबत लग्न केले. इनायापासूनही लकीला दोन मुले झालीत. पण तिच्यापासूनही लकी विभक्त झाला. यानंतर लकीच्या आयुष्यात आयशा आली. लकी आणि आयशाला  एक मुलगा आहे ज्याचे नाव डॅनी मकसूद अली आहे.

ये है जिंदगी', 'हमारे तुम्हारे','त्रिकाल' या सिनेमामंघ्ये दिसला होता त्यानंतर त्याने सिनेमांमधून ब्रेक घेतला. 2002 मध्ये आलेल्या ‘कांटे’ सिनेमामधून कमबॅक केला. लकी शेवटचा 'सुर-द मेलोडी ऑफ लाईफ' सिनेमाध्ये दिसला होता.हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातील गाण्यांनी लकी अलीला एक नवी ओळख दिली होती. ‘एक पल का जीना’ आणि ‘क्यो होता है प्यार’ ही दोन गाणी लकीने गायली होती. ही दोन गाणी लकीने गायली होती. पण यानंतर लकी गायकीच्या क्षेत्रातही फार चमकला नाही.