Join us

बॉलिवूडमधील शायरीचे धुरंधर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 14:02 IST

सिनेमा आणि साहित्य याचा जवळचा संबध आहे. साहित्याचे नवे रूप म्हणून सिनेमाला पाहिले जाते. साहित्य क्षेत्रात मुक्त संचार करणा-या ...

सिनेमा आणि साहित्य याचा जवळचा संबध आहे. साहित्याचे नवे रूप म्हणून सिनेमाला पाहिले जाते. साहित्य क्षेत्रात मुक्त संचार करणा-या अनेक रचनाकारांनी सिनेमाच्या झगमगत्या दुनियेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक दिग्गज साहित्यिकांच्या रचनांनी सिनेमाला नवी उंची दिली आहे. नुकतेच शायर निदा फाजली यांचे निधन झाले. साहित्य क्षेत्रातील अशाच काही धुरंधरांनी बॉलिवूडमध्येही आपल्य प्रतिभेचे झेंडे रोवले आहेत. निदा फाजलीउर्दूचे प्रसिद्ध शायर निदा फाजदी यांनी रविवारी जगाचा निरोप घेतला. ते उर्दू शायरी पासून बॉलिवूडमध्ये दाखल झालेत आणि प्रसिद्धही झालेत. मात्र ते अगोदरपासूनच उर्दूचे प्रसिद्ध शायर होते. 'आँख और ख्वॉब के दरमियाँ', 'लफ्जों का पुल', 'शहर मेरे साथ चल तू', 'दीवारों के बाहर' या सारख्या त्यांच्या प्रसिद्ध रचना आहेत. कैफी आजमी'आवारा सजदे', 'इंकार', 'आखिरे-शब' सारखी उर्दू रचना करणारे शायर कैफी आजमी यांचे शेरो-शायरीच्या जगात आपले वर्चस्व होते. मात्र आर्थिक सुबत्ता असलेली पत्नी शौकत सोबत जेव्हा ते मुंबईला आले तर येथेदेखील त्यांनी छाप पाडली. ते कैफी आजमीच होते, ज्यांनी 'हीर-रांझा' या संपूर्ण चित्रपटाला शायरीचे स्वरूप दिले. चित्रपटाचा प्रत्येक संवाद शायरीच्या अंदाजात बोलला जातो. 'कर चले हम फिदा, जान-ओ-तन साथियों', 'मिलो न तुम तो हम घबराए', 'ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नहीं' यासारखे कित्येक गाणे आहेत, ज्याचे शब्द आजही आपल्या मनात बसले  आहेत.मजरूह सुल्तानपुरीमजरूह सुल्तानपुरी प्रगतिशील आंदोलनकर्ते उर्दूचे सर्वात मोठे शायरमधले एक होते. याचसोबत बॉलिवूडचे सुपरहिट फिल्में 'सीआईडी', 'चलती का नाम गाड़ी', 'नौ-दो ग्यारह', 'तीसरी मंजिल' आदी चित्रपटांचे गाणेदेखील मजरूह यांनीच लिहीले. यात 'तेरे मेरे मिलन की ये रैना', 'जाइए आप कहां जाएंगे', 'रहे न रहे हम', 'ठाढ़े रहियो', 'एक लड़की भीगी भागी सी', 'चुरा लिया है तुमने जो दिल को' आदी मुख्य आहेत.शकील बदायूनी'शाम-ओ-हरम', 'रंगीनियां', 'शकील बदायूनी की शायरी', 'शकील बदायूनी की रूमानी शायरी' या सारख्या उत्कृष्ट रचनांसाठी शकील बदायूनी उर्दू शायरीच्या जगात नावारुपाला आले होते. मात्र जेव्हा ते चित्रपटात आले तर त्यांनी नव्या प्रकारचे गाणे लिहीले. शकील यांनी, 'चौदवीं का चांद हो', 'सुहानी रात ढल चुकी', 'मन तड़पत हरि दर्शन को आज', 'दो सितारों का जमी पर है मिलन', 'कहीं दीप जले कहीं दिल', 'मधुबन में राधिका नाचे', 'प्यार किया तो डरना क्या', 'रहा गरदिशों में हरदम मेरे इश्क का सितारा', 'तेरे हुस्न की क्या तारीफ करू' सारखे प्रसिद्ध गाणे दिले.शहरयारशेर-ओ-हिकमत, इज्म-ए-अजम, ख्वाब का दर बंद है, फिरक-ओ-नजर सारख्या उच्च श्रेणीच्या उर्दू रचना करणारे अखलाक मुहम्मद खान उर्फ शहरयारचे नाव उर्दूच्या जगात सन्मानाने घेतले जाते. त्यांनी शेरो-शायरीच नव्हे, उर्दू साहित्यातही सेवा केली आहे. पण ते जेव्हा चित्रपट जगात उतरले तर त्यांच्या गाण्यांनी लोकांना दिवाना बनवून टाकले, विशेषत: उमराव जान या चित्रपटातील गाण्यांनी, 'दिल चीज क्या है', 'इन आंखों की मस्ती के', 'ये क्या जगह है दोस्तों'।हसरत जयपुरीएकदा उर्दूची शायरी वाचणाºया एक तरूणावर अभिनेता पृथ्वीराज कपूरची नजर पडली. मुशायराच्या जगात ते वेगाने पुढे जात होते. पृथ्वीराज कपूरने लगेच आपला मुलगा राज कपूरला हसरतचे नाव सुचविले, कारण त्यावेळी कित्येक चित्रपटाच्या निर्मितीसाठी ते आवर्जून लागले होते. तेव्हा हसरत मुंबईच्या एका बस वाहकाची नोकरी करीत होते. मात्र जसेही हसरतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले, 'जिया बेकरार है', 'जिंदगी एक सफर है सुहाना', 'एहसान तेरा होगा मुझपर', 'दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में सामाई', 'सुन साइबा सुन', 'तुम मुझे यूं भुला न पाओगे' यासारखे गाणे लिहीले.साहिर लुधियानवीपंजाबचे प्रसिद्ध शायर मशहूर उर्दू पत्र अदब-ए-लतीफ, शाहकार आणि शाहराह, प्रीतलड़ी सारख्या उर्दू पत्रिकाचे संपादक होते. त्यांच्या रचनांचा संग्रह 'तल्खियां' देखील त्यांची ओळख आहे. मात्र जेव्हा त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले, तर येथेही झेंडे लावले. साहिरने ‘मैं पल दो पल का शायर हूं’ ‘चलो एक बार फिर से अजनबी बन जाएं’, ‘ईश्वर अल्लाह तेरे नाम’, ‘यह दुनिया अगर मिल भी जाये तो क्या ह’ या सारखे गाणे लिहीले. लेखिका अमृता प्रीतम सोबत त्यांचे नाव जोडले गेल्याने ते खूप चर्चेत राहीले. मात्र ते आजीवन अविवाहित राहीले.जांनिसार अख्तरप्रगतिशील लेखक आंदोलनाचे प्रभावी आंदोलनकर्ते व उर्दू शायर जांनिसार अख्तरने शायरीचे ते बीजारोपन केले, ज्याचा सुगंध आजही आपल्यात दरवळत आहे. कधी जावेद अख्तरच्या लेखणीतून तर कधी-कधी फरहान अख्तरच्या आवाजात. 'खाक-ए दिल' सारखी रचना करणारे जांनिसार बॉलिवूडला देखील आपल्या सदाबहार गाण्यांनी उन्नत केले. त्यांचे 'आंखों ही आंखों में इशारा हो गया', 'आजा रे ओ मेरे दिलबर आजा', 'ऐ दिले नादां', 'सैयां के गांव में तारों के छांव में', 'चोरी-चोरी कोई आए' हिन्दी पट्टीत खूप प्रसिद्ध झालेत. त्या गाण्यात हिन्दी-उर्दूचे फार मोठे संयोजन होते. ज्याला त्यांचा मुलगा जावेदने पुढे चालना दिली.जावेद अख्तरजावेद अख्तरचे संगोपन चित्रपटमय वातावरणात झाले आहे. म्हणून त्यांची उर्दू शायरी गौरवास पात्र आहे. त्यांनी ग्लॅमरात राहून शायरीमध्ये उल्लेखनीय योगदान दिले. त्यांचे उर्दू शायरीचे कित्येक संकलन प्रकाशित देखील झाले आहेत. त्यांनी सलीम खान सोबत कित्येक चित्रपटांच्या पटकथादेखील लिहील्या आहेत. यात शोले जास्तच प्रसिद्ध आहे. 'देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए', 'जादू भरी आंखों वाली सनम तुम मुझको ऐसे देखा न करो', 'रुत आ गई रे', 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा', 'संदेशे आते हैं', 'ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा', 'सागर किनारे दिल ये पुकारे' सारखे कित्येक गाणे लोकांच्या मनात बसलेले आहेत. ते आताही सक्रिय लेखन करीत आहेत.