बॉलिवूडने भेदली ‘चिनी दिवार’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 16:01 IST
सतीश डोंगरेसध्या चीनच्या बॉक्स आॅफिसवर बॉलिवूड चित्रपटांचा जबरदस्त दबदबा बघावयास मिळत आहे. देश-विदेशांत तुफान कमाई करणारा ‘बाहुबली-२’ हा ...
बॉलिवूडने भेदली ‘चिनी दिवार’
सतीश डोंगरेसध्या चीनच्या बॉक्स आॅफिसवर बॉलिवूड चित्रपटांचा जबरदस्त दबदबा बघावयास मिळत आहे. देश-विदेशांत तुफान कमाई करणारा ‘बाहुबली-२’ हा चित्रपट सध्या चीनमध्ये धडकला असून, कमाईचे अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी गेल्या तीन आठवड्यांपासून सुपरस्टार सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट चीनच्या बॉक्स आॅफिसवर कोट्यवधी रूपयांचा गल्ला जमवित आहे. आतापर्यंत या चित्रपटाने २३३ कोटी रूपयांचा गल्ला जमविला आहे. मात्र अचानकच चीनच्या बॉक्स आॅफिसवर बॉलिवूड चित्रपटांचा प्रभाव का वाढला? हा करिश्मा कसा घडला? याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट... ‘थ्री इडियट्स’ने उभारली गुढी२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाने चीनच्या बॉक्स आॅफिसवर खºया अर्थाने गुढी उभारली. फिल्म ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी सांगितले की, ‘थ्री इडियट्स’ आणि ‘पीके’ या चित्रपटांनी चीनमध्ये हिंदी चित्रपटांना खºया अर्थाने बाजारपेठ मिळवून दिली. पुढे याचा फायदा ‘दंगल’ला झाला. कारण या चित्रपटाला चीनमध्ये अधिक स्क्रीन मिळविण्यात यश आले. चीनमध्ये हिंदी चित्रपट मंदारिनमध्ये प्रदर्शित होत असतात. त्याचाही फायदा कमाईसाठी होत असल्याचे आदर्श यांनी सांगितले. चिनी लोकांना पटकथेत रस‘बजरंगी भाईजान’चे दिग्दर्शक कबीर खान नुकतेच चीनमध्ये गेले होते. त्यांनी सांगितले की, ‘चिनी लोकांना बाहेरचे टॅलेंट भावते. त्यामुळेच याचा फायदा हॉलिवूडबरोबर बॉलिवूडलाही होत आहे. हॉलिवूडसाठीही चीन दुसरी सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. हिंदी चित्रपटांमधील कंटेंटमुळेच चिनी लोक त्यास पसंत करीत आहेत. यूनान अकॅडमी आॅफ सोशल सायंसेजमध्ये असिस्टेंट प्रोफेसर असलेल्या हू शियाओवेन यांनी ‘थ्री इडियट्स, पीके आणि सीक्रेट सुपरस्टार’ हे तिन्ही चित्रपट बघितले. त्यांनी सांगितले की, या तिन्ही चित्रपटांमध्ये मानवी संवेदनेबद्दल दाखविण्यात आल्यानेच चिनी लोकांना हे चित्रपट भावत आहेत. या चित्रपटांमध्ये स्पेशल इफेक्ट्सचा अजिबात भडिमार करण्यात आला नाही तर एकच स्टोरी अतिशय सिम्पल पद्धतीने दाखविण्यात आली आहे. बॉलिवूडच्या तुलनेत हॉलिवूडपट फास्ट फूडप्रमाणे असतात, असेही त्यांनी सांगितले. आमिरने भेदली ‘चिनी दिवार’‘थ्री इडियट्स, पीके, दंगल आणि सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटांमुळे आमिर खान चीनमध्ये खूप मोठा सुपरस्टार म्हणून समोर आला आहे. त्याचबरोबर हिंदी चित्रपटांना चीनच्या बाजारात स्थान मिळवून देण्याचे यशही त्यालाच द्यावे लागेल. केवळ चीनची जनताच नव्हे तर तेथील स्टार्सही त्याच्या अभिनयाचे दिवाने आहेत. वास्तविक पश्चिमच्या तुलनेत भारत आणि चीनच्या संस्कृतीत बºयापैकी साम्य आहे. त्यातच हिंदी चित्रपटांमधील गाणी आणि डान्स येथील जनतेसाठी खूपच स्पेशल आहेत, कारण चिनी चित्रपटांमध्ये यांचा समावेश नसतो. भारत आणि चीनमधील तिकीट दरांमधील फरकबॉलिवूडपटांना चीनमध्ये बक्कळ करण्यामागचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे दोन्ही देशांमधील तिकिटांच्या दरांमधील तफावत होय. कारण चीनमध्ये तिकिटाची किंमत कमीत कमी ७७९ रूपये आहे, तर भारतात १०० रूपये आहे. स्क्रीनच्या संख्येतही खूप मोठा फरक आहे. कारण भारतात स्क्रिनची संख्या ८,५०० इतकी आहे, तर चीनमध्ये ४५,००० इतकी आहे. केपीएमजीच्या नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, २०१२ मध्ये बॉलिवूडपटांनी विदेशात ७६० कोटी रूपयांची कमाई केली होती. २०१६ मध्ये हा आकडा ११०० कोटींपर्यंत पोहोचला. यामध्ये चीनमधील कमाईचा खूप मोठा वाटा आहे.