Join us  

बॉलिवूडच्या चित्रपटांचे ‘राजकारण’!

By अबोली कुलकर्णी | Published: December 12, 2018 12:27 PM

राजकारणावर आधारित असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी बॉलिवूड चित्रपटांवर त्यांची एक वेगळी छाप सोडली आहे.

अबोली कुलकर्णी

 बॉलिवूडमध्ये विविध विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती केली जाते. राजकारणावर देखील अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. यातील काही चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर गल्ला जमवला तर काहींना मात्र रिकाम्या हाती परतावे लागले. राजकारणावर आधारित असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी बॉलिवूड चित्रपटांवर त्यांची एक वेगळी छाप सोडली आहे. चला तर मग पाहूयात असे कोणते चित्रपट आहेत की जे कायम चर्चेत राहिले आहेत...

* गुलाल : हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला असून विद्यार्थ्यांच्या राजकारणावर आधारित या चित्रपटाचे कथानक होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले होते. चित्रपटात राजसिंग चौधरी, केके मेनन आणि दीपक डोबरियाल या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या.

* नायक :हा चित्रपट असा आहे की, तो प्रत्येकाने पाहिलाच असणार, यात काही शंका नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस.शंकर यांनी केले असून चित्रपटातील मुख्य कलाकार अनिल कपूर आणि अमरिश पुरी हे दिग्गज कलाकार होते. हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला असून चित्रपटाची कहानी ही एका सामान्य व्यक्तीच्या मुख्यमंत्री बनण्याची आहे.

* राजनीती :  प्रकाश झा दिग्दर्शित या चित्रपटात कौटुंबिक राजकारण दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, अर्जुन रामपाल, नाना पाटेकर, मनोज वाजपेयी आणि कॅटरिना कैफ यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. हा चित्रपट २०१० या वर्षात प्रदर्शित झाला होता.

* डर्टी पॉलिटिक्स : हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचे दिग्दर्शन केसी बोकाडिया यांनी केले होते. हा एक राजकीय ड्रामा चित्रपट असून यात अभिनेत्री मल्लिका शेरावत, ओम पुरी आणि नसीरूद्दीन शाह हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत होते. चित्रपटाची कहानी एका महिला डान्सरच्या राजकीय प्रवासावर आधारित आहे.

* सत्याग्रह : हा चित्रपट सामाजिक कार्यकर्ता अन्ना हजारे यांच्या ‘अण्णा अनशन’ यावरून प्रेरित चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे. या चित्रपटात अजय देवगण, अर्जुन रामपाल, अमिताभ बच्चन आणि करिना कपूर खान यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला असून चित्रपटाची कथा एका अपघातात मृत्यू पावलेल्या मुलाच्या वडिलांच्या उपोषणावर आधारित आहे. 

टॅग्स :राजकारणबॉलिवूड