Join us  

‘या’ विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होती तब्बू! हैदराबादेत घेतले होते घर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 9:00 PM

विजयपथ या सिनेमातून फिल्मी करिअर सुरु करणारी अभिनेत्री तब्बू आजही अविवाहित आहे. तब्बू आजही अविवाहित असली तरी तिचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले.

ठळक मुद्दे माचिस, चांदनी बार या चित्रपटांमधील भूमिकांसाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

विजयपथ या सिनेमातून फिल्मी करिअर सुरु करणारी अभिनेत्री तब्बू आजही अविवाहित आहे. मी अविवाहित असण्याला अजय देवगण जबाबदार असल्याचे तब्बूने अनेक एका मुलाखतीत सांगितले आहे. ‘ मी आणि अजय आम्ही  25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. अजय हा माझ्या चुलत भावाच्या शेजारी राहत होता. माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून अजय माझ्यासोबत आहे. त्या काळात माझा चुलत भाऊ समीर आणि अजय दोघे सतत माझ्यासोबत असायचे. कुठलाही  मुलगा माझ्यासोबत बोलला तरी हे दोघे त्यांना धमकावत असत. आजही मी अविवाहित ते फक्त अजय देवगणमुळेच. त्याने माझ्यासोबत काय केले या गोष्टीचा अजयला केव्हा तरी नक्कीच पश्चात्ताप होईल, असे तब्बू अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली होती. तब्बू आजही अविवाहित असली तरी तिचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले. संजय कपूर, साजिद नाडियाडवाला आणि नागार्जुन यांच्यासोबत तब्बूच्या अफेअरच्या चर्चा बºयाच रंगल्या.

नागार्जुनसोबतचे तिच्या अफेअरची चर्चा तर प्रचंड रंगली. असे म्हणतात की,दोघांचेही नाते १५ वर्षे चालले. अर्थात दोघांचेही लग्न होऊ शकले नाही. याचे कारण म्हणजे, नागार्जुन विवाहित होते.

नागागर्जुन विवाहित होते. पण तब्बू त्यांच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की, तिने मुंबई सोडून  हैदराबादेत नागार्जुन राहायचे अगदी तिथेच घर घेतले होते. तब्बूने अनेक वर्षे नागार्जुन यांची प्रतीक्षा केली. पण नागार्जुन पत्नीला घटस्फोट द्यायला राजी नव्हते. अखेर तब्बूने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आणि २०१२ मध्ये दोघेही कायमचे वेगळे झाले.

९० च्या दशकात तब्बूचे नाव निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत जुळले. या नात्यांच्या बातम्यांनी बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. पण तब्बूच्या मित्रांच्या मते, या निव्वळ अफवा होत्या. तब्बू दिव्या भारतीची मैत्रिण होती आणि त्यामुळे ती साजिदची मदत करत होती. जेणेकरून दिव्याच्या मृत्यूनंतर तिच्या आठवणीतून त्यांना बाहेर काढू शकेल.

अभिनेत्री तब्बूचे आजही अनेक चाहते आहेत.९० च्या दशकात तब्बूच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर धुमाकूळ घातला होता. १९८० मधल्या बाजार चित्रपटात तब्बू पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांत काम केले. माचिस, चांदनी बार या चित्रपटांमधील भूमिकांसाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

टॅग्स :तब्बू