Join us

‘कान्स’मध्ये या बॉलिवूड अभिनेत्रींनी दाखविला फॅशनचा जलवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 17:04 IST

यंदाच्या कान्स २०१८ मध्ये भारतीय अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्याचा असा काही जलवा दाखविला की, त्याची दखल जगभरातील माध्यमांना घ्यावीच लागली. ...

यंदाच्या कान्स २०१८ मध्ये भारतीय अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्याचा असा काही जलवा दाखविला की, त्याची दखल जगभरातील माध्यमांना घ्यावीच लागली. सोनम कपूर, दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय-बच्चन आणि कंगना राणौत यांच्या अदांनी तर सर्वांनाच मोहिणी घातली. वास्तविक आतापर्यंत कान्सच्या व्यासपीठावरून कधीही भारतीय अभिनेत्रींच्या सौंदर्याची चर्चा रंगली नाही. मात्र यावर्षीचा अंदाज काही औरच होता. कारण अभिनेत्रींनी कान्समध्ये केवळ जगाचे लक्षच वेधले नाही तर आपला ठसाही उमटविला, याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...दीपिका पादुकोणबॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणने यंदाच्या कान्समध्ये आपल्या सौंदर्याची जादू अशी काही दाखविली की, तिचे नाव ‘बेस्ट ड्रेस्ड लिस्ट’मध्ये सहभागी केले गेले. विदेशी मीडियाने तर तिच्या कौतुकाचे इमले बांधले. दीपिका जेव्हा आशी स्टुडिओचा पिंक रफ्ल्ड गाउन परिधान करून रॅम्पवर उतरली तेव्हा उपस्थितांची बोलतीच बंद झाली. एरवी दीपिकाच्या फॅशन च्वॉइसला बोअरिंग म्हटले जायचे. परंतु यावेळेस तिचा अंदाज काहीसा निराळाच होता. सोनम कपूरन्यूली वेड सोनम कपूर यावेळी आॅफ व्हाइट लहेंगा परिधान करून रेड कार्पेटवर उतरली होती. तिच्या हातात लग्नाची मेहंदी स्पष्टपणे दिसत होती. तिने परिधान केलेला हा सुंदर लहेंगा राल्फ अ‍ॅण्ड रूसोने डिझाइन केला होता. जेव्हा सोनमच्या फॅशनबद्दल बोलले जाते तेव्हा प्रत्येकालाच अपेक्षा असते की, ती नक्कीच काहीतरी हटके करणार. यावेळेस अगदी तसेच घडताना दिसले. तिचा फॅशन सेन्स पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आला. ऐश्वर्या राय-बच्चन‘छान किती दिसते फुलपाखरू’ याप्रमाणेच ऐश्वर्या दिसत होती. यावेळी ऐश्वर्याने ड्रमॅटिक बटरफ्लाय ड्रेस परिधान केला होता. ज्यास मायकल चिनो याने डिझाइन केला होता. या ड्रेस पर्पल, रेड आणि ब्ल्यू रंगाचे शेड्स होते. १० मीटर लांबीचा हा ड्रेस बनविण्यासाठी तब्बल तीन हजार तास लागल्याची माहिती समोर आली आहे. कंगना राणौतबॉलिवूडची क्वीन कंगना राणौत कान्स २०१८ मध्ये साडीपासून ते गाउनपर्यंतच्या वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये बघावयास मिळाली. वास्तविक कंगना प्रयोग करण्यास कधीच मागे हटत नाही. हा प्रयोग ती कान्समध्येही करताना बघावयास मिळाली. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तर कंगना कमालीची दिसत होती. नानुष्काच्या या रेड लेटेक्स ड्रेसमध्ये एंट्री करून तिने अनेकांना अचंबित केले. फॅशनेबल गॉगल्स आणि हेअरस्टाइलमध्ये कंगना कमालीची दिसत होती. हुमा कुरेशीअभिनेत्री हुमा कुरेशी हीदेखील कान्समध्ये बघावयास मिळाली. एलियो अबू फैजलने डिझाइन केलेल्या सिल्वर स्लिप ड्रेसमध्ये हुमा बघावयास मिळाली. या लूकमध्ये ती खूपच गॉर्जियस दिसत होती. असे वाटत होते की, हुमाने मेकओव्हर केला असावा. कारण तिच्या अदा बघण्यासारख्या होत्या. सयानी गुप्ताकान्समध्ये सयानी गुप्ताचा फॅशन गेम प्रत्येकवेळी आॅन प्वॉइंट होता. धोती-साडी  आउटफिटमध्ये सयानीचा अंदाज खूपच पसंत केला गेला. या धोतीवर तिने पंजाबी शूज घातले होते. ज्यामुळे तिचा लुक आणखीच रूबाबदार दिसत होता. सयानीदेखील कान्समध्ये आपली छाप सोडून गेली. रसिका दुग्गल अभिनेत्री रसिका दुग्गल ‘मंटो’ या चित्रपटासाठी कान्समध्ये उपस्थित होती. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत आहे. रसिकाने यावेळी रॉ मॅँगोची सिम्पल पेल साडी परिधान केली होती. तिचा लूक सिम्पल पण क्लासी होता. कारण या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. शिवाय तिच्या फॅशन सेन्सचे कौतुकही केले गेले.