Join us  

करिअरमध्ये नाही पण वैवाहिक आयुष्यात विद्या सिन्हा यांना करावा लागला होता मोठा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 3:20 PM

वयाच्या 18 व्या वर्षीच विद्या सिन्हा यांनी मॉडेलिंग आणि अ‍ॅक्टिंग सुरु केली होती. यासाठी त्यांना फार संघर्ष करावा लागला नाही. कारण त्यांचे वडील स्वत: निर्माते होते. पण खासगी आयुष्यात मात्र त्यांना बराच मोठा संघर्ष करावा लागला.

ठळक मुद्देपतीच्या निधनानंतर 2001 मध्ये विद्या यांनी  ऑस्ट्रेलियात स्थायिक नेताजी भीमराव साळुंखे यांच्याशी दुसरा विवाह केला.

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. त्या दीर्घकाळापासून हृदयविकार व फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्याचे अनेक चित्रपट गाजलेत. वयाच्या 18 व्या वर्षीच विद्या सिन्हा यांनी मॉडेलिंग आणि अ‍ॅक्टिंग सुरु केली होती. यासाठी त्यांना फार संघर्ष करावा लागला नाही. कारण त्यांचे वडील स्वत: निर्माते होते. पण खासगी आयुष्यात मात्र त्यांना बराच मोठा संघर्ष करावा लागला.

चित्रपटात येण्यापूर्वीच विद्या सिन्हा यांनी प्रेमविवाह केला होता. 1968 मध्ये व्यंकटेश्वरम अय्यर यांच्याशी त्यांनी लग्न केले. पण 1996 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. 

पतीच्या निधनानंतर 2001 मध्ये विद्या यांनी  ऑस्ट्रेलियात स्थायिक नेताजी भीमराव साळुंखे यांच्याशी दुसरा विवाह केला. असे म्हणतात की, इंटरनेटवर विद्या नेताजी भीमराव साळुंखेच्या प्रेमात पडल्या होत्या. लग्नानंतर विद्या त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्यात. पण काहीच महिन्यांत पतींकडून त्यांच्या छळाच्या बातम्या येऊ लागल्या. पैशांसाठी दुसरा पती विद्यांचा छळ करू लागला होता. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांना मारहाण करू लागला होता. विद्या यांनी या स्थितीचा खंबीरपणे सामना केला आणि पतीविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर काहीच महिन्यांत त्यांनी दुस-या पतीपासून घटस्फोट घेतला होता.

विद्या यांनी अनेक हिट चित्रपट दिलेत. त्याचमुळे राज कपूर यांनी त्यांना ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट ऑफर केला होता. पण विद्या यांनी या ग्लॅमरस भूमिकेला नकार दिला. त्याकाळात राज कपूर यांना नकार देणे एक मोठी गोष्ट होती. पण विद्या यांनी आपल्या अटींवर काम केले. चित्रपटांसाठी त्यांनी कुठलीही तडजोड केली नाही.

टॅग्स :विद्या सिन्हा