Join us  

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन करणार 'जियो जुनून'चे उद्धाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 8:47 PM

अशियन हेरिटेज फाउंडेशनने जियो ही संकल्पना सुरू केली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून गावाकडील गरीब पण कुशल लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

अशियन हेरिटेज फाउंडेशनने जियो ही संकल्पना सुरू केली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून गावाकडील गरीब पण कुशल लोकांच्या कलेला प्रोत्साहन देण्यात येत आहे. जियो ही संकल्पना श्री. राजीव सेठी यांची असून यामध्ये जुनून ब्रॅण्ड अंतर्गत गावाकडील लोकांनी बनवलेल्या गोष्टी विकल्या जाणार आहेत. या वस्तूंचे प्रदर्शन मुंबईतील ग्रॅण्ड हयात येथे ३० मार्च  ते ४ एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बॉलिवूडच्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या हस्ते होणार आहे. 

जियोच्या दहाव्या वर्धपनादिनानिमित्त सहा दिवस सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. या दरम्यान जुनूूनच्या अद्वितीय व विलक्षणीय अशा डिझाईन्स व वस्तू सादर करण्यात येणार आहेत. इसेंस बर्नर्स, सिल्क इकाट्स, नैसर्गिक वस्तू, डिझाईन केलेल्या मॉड्युलर वॉल टाईल्स, कॉटन ब्रॉकेड, ग्रास फर्निचर, कागदांपासून बनवलेल्या सजावटींच्या वस्तू, शिवणाकाम केलेल्या वस्तू, लेदर लॅम्प्स, जंगलातील खाद्य वस्तू आणि बरेच काही या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. बाजारात उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपेक्षा वेगळ्या व जास्त वस्तू इथे उपलब्ध असणार आहेत. या ठिकाणी उत्साहपूर्ण संवाद, परफॉर्मन्स आणि वैविध्यपूर्ण अशा अनुभवाचा उपभोग घेता येणार आहे. पारंपारिक, हस्त व मशिन निर्मित, स्थानिक ते जागतिक पातळीवरील विविध शिल्पकला व वस्तू पाहायला मिळणार आहेत.बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती. जया बच्चन यांच्या हस्ते जियो जुनूनचे ३० मार्च रोजी उद्घाटन करणार आहेत. जया बच्चन व जियोचे राजीव सेठी यांची बऱ्याच वर्षांपासूनचे चांगले मित्र आहेत. जया बच्चन यांनी 'अपनी कहानी अपनी जुबानी' या कार्यक्रमात जियो जुनूनच्या निर्मात्यांचा उल्लेख केला होता. जया बच्चन यांची मुलगी श्वेताने या प्रदर्शनात पारंपारिक ते आधुनिकतेमध्ये झालेल्या बदलांवरील तिचे मत सादर करण्यासाठी आयोजकांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रदर्शनादरम्यान काही दिवस खूप अप्रतिम अशा गोष्टींची व संवादाची देवाणघेवाण होणार आहे. 

टॅग्स :जया बच्चन