Join us  

Lockdown : कधी न बोलणारी दिव्या खोसला अचानक केजरीवालांवर बसरली, सोशल मीडियावर ट्रोल झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 1:53 PM

टी-सीरिजचे सर्वेसर्वा भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार कधी नव्हे इतकी अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. 

ठळक मुद्देकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दिव्याचे पती भूषण कुमार यांनी पीएम केअर्स फंडात 11 कोटींची मदत दिली आहे.

टी-सीरिजचे सर्वेसर्वा भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार कधी नव्हे इतकी अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. आत्तापर्यंत केवळ स्वत:चे ग्लॅमरस फोटो शेअर करून चर्चेत राहणा-या दिव्या खोसला कुमारने अचानक असे काही केले की, सगळेच चकीत झालेत. केवळ इतकेच नाही तर तिच्यामुळे सोशल मीडिया दोन भागात विभागला गेला. आता हा नेमका मामला काय ते वाचा.तर झाले असे की, दिव्या खोसला कुमारने एक ट्विट केले आणि तिच्या ट्विटनंतर सोशल मीडियावरचे युजर्स दोन भागात विभागले गेले. आपल्या ट्विटमध्ये दिव्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी अख्खा देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशात हातावर पोट असणा-यांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्याने हजारो मजूर, कामगार प्रसंगी पायपीट करून स्थलांतर करत आहेत. दिल्लीतून हजारो मजुरांचे स्थलांतर सुरु आहे. दिल्ली सरकार या मजुरांच्या मदतीसाठी अनेक स्तरावर अपयशी ठरल्याचे आरोपही होत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिव्याने केजरीवालांना लक्ष्य केले.‘ संपूर्ण देशाला याघडीला निधीची गरज असताना केजरीवाल न्यूज चॅनलवर स्वत:च्या खासगी जाहिरातींवर इतका पैसा का खर्च करत आहेत? एक व्यक्ति नागरिक या नात्याने मी अरविंद केजरीवालांना हा प्रश्न विचारते आहे,’ असे ट्विट दिव्याने केले.

दिव्याच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर जणू घमासान सुरु झाले. अनेकांनी दिव्याची बाजू घेऊन केजरीवालांना निशाणा बनवणे सुरु केले तर काहींनी यावरून केजरीवालांची पाठराखण करत, दिव्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

हाच प्रश्न तू मोदींना किंवा केंद्रीय नेत्यांना का विचारत नाहीस, अशा शब्दांत काही युजर्सनी दिव्याला ट्रोल केले.

 दिव्याच्या पतीने दिलेत 11 कोटीकोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दिव्याचे पती भूषण कुमार यांनी पीएम केअर्स फंडात 11 कोटींची मदत दिली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कोषातही त्यांनी 1 कोटींची मदत दिली आहे.

टॅग्स :दिव्या कुमारकोरोना वायरस बातम्या