Join us  

लिव्ह इन रिलेशनशिपमधून आई झाली, मग बॉयफ्रेंडने सोडली साथ; आता साखरपुडा करत अभिनेत्रीची नवी सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 1:42 PM

आपल्या बोल्ड, बिनधास्त आणि दिलखेचक अदांनी चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री एमी जॅक्सन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Amy Jackson : सध्या सोशल मीडियावर एमी जॅक्सनच्या साखरपुड्याची बातमी वाऱ्यासारखी पसरतेय. याला कारण ठरतेय या अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट. नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या साखरपुड्यासंदर्भात चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सनने स्वित्झर्लंडमधील गस्टाडमध्ये अभिनेता-संगीतकार एड वेस्टविकसोबत साखरपुडा केला आहे. 

‘एक दीवाना था’ आणिं ‘सिंह इज ब्लिंग’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत तिने प्रेक्षकांची मने जिंकली. अलिकडेच बॉयफ्रेंड एड वेस्टविकने तिला खास अंदाजात प्रपोज करत रिंग घातली आहे. बॉयफ्रेंड एड वेस्टविकने फिल्मी अंदाजात अभिनेत्रीशी साखरपुडा केल्याचे रोमॅन्टिक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल  होत आहेत. 

२०२२ पासून एकमेकांना डेट करत आहेत- 

एमी आणि एड हे मागील काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे वृत्त समोर येत होते. २०१९ मध्ये एमी जॅक्सनने बिझनेसमॅन जॉर्ज पानायियोटौसोबत एंगेजमेंट केली होती. जॉर्ज पनायोटौ यांची गणना ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते.  

जॉर्जने २०१९ मध्ये एमीला प्रपोज केलं होतं. त्यानंतर दोघे लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये राहत होते. त्याच दरम्यान अभिनेत्रीला दिवस गेले. त्यांना अँड्रियास नावाचा मुलगाही आहे. पण, त्यानंतर काही वैयक्तिक कारणांमुळे दोघांनी नात्याला पूर्णविराम दिला आणि ते वेगळे झाले.

२०२२  मध्ये अभिनेत्रीची भेट एड वेस्टविक सोबत झाली, आणि त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करु लागले.अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाइउंटवरुन तिच्या साखरपुड्याचे काही फोटो शेअर केलेत. या व्हायरल फोटोंमध्ये एमी आणि एड प्रचंड खुश दिसतायत. गुडघ्यावर बसून सिनेस्टाईलमध्ये एड वेस्टविलने एमीच्या हातात रिंग घातली आहे.  या फोटोंना 'Hell  YES' असं कॅप्शन देत एमीने आपल्या नात्याची कबुली दिली आहे. एक लक्षवेधी बाब म्हणजे अभिनेत्री  कियारा अडवाणी, ओरी, अथिया शेट्टी, श्रुती हासन, सोफी चौधरी यांसारख्या सेलिब्रिटींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :एमी जॅक्सनबॉलिवूड