Join us  

Exclusive ! बॉलिवूडच्या या अभिनेत्याचे महाराष्ट्राशी आहे हे खास कनेक्शन, वाचून तुम्हालाही वाटेल कौतूक

By गीतांजली | Published: September 12, 2019 2:00 PM

त्याने आपल्या करिअरची सुरुवात 'किस्मत लव पैसा दिल्ली' या सिनेमातून केली मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती राणी मुखर्जीच्या मर्दानी सिनेमातून.

त्याने आपल्या करिअरची सुरुवात 'किस्मत लव पैसा दिल्ली' या सिनेमातून केली मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती राणी मुखर्जीच्या मर्दानी सिनेमातून. या सिनेमात ताहिर राज भसिनने साकारलेली खलनायकाची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडली. यानंतर ताहिर मंटो आणि फोर्स-2 मध्ये दिसला. 

गेल्या शुक्रवारी रिलीज झालेल्या सुशांत सिंग राजपूतच्या छिछोरे सिनेमात ताहिरने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ताहिरने साकारलेली डेरेकची भूमिका देखील प्रेक्षकांना आवडली आहे. 

ताहिरच्या वैयक्तिक आयुष्यात बाबत बोलायचे झाले तर त्याचा जन्म दिल्लीतील एक पंजाबी कुटुंबात झाला आहे. ताहिरचे आजोबा आणि बाबा एअरफोर्समध्ये होते. त्यामुळे देशातील वेगवेगळ्या भागात ताहिरचे शिक्षण झाले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का पंजाबी कुटुंबात जन्मालेल्या ताहिरचे मराठीशी एक वेगळं नातं आहे. होय तुम्ही बरोबर वाचलातं. ताहिरच्या आईची आई मराठी आहे. त्यामुळे ताहिराला मराठी भाषा बऱ्यापैकी समजते. तसेच त्याला भविष्यात मराठी शिकायची देखील आहे असे. 

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, ताहिर रणवीर सिंगच्या 83 सिनेमात लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांची भूमिका साकारत आहे. रणवीर सिंगनंतर ताहिर भसीनचे कास्टिंग करणे सगळ्यात कठीण गेल्याचे कबीर खान सांगतो. नुकतेच लंडनमध्ये या सिनेमाचे पहिले शेड्यूल पूर्ण केले आहे. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.  '८३' हा  सिनेमा १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :रणवीर सिंग८३ सिनेमा