Join us  

१३०० हजार फुटांवरून स्कायडायव्हिंग करत सिद्धार्थ मल्होत्राने लॉन्च केलं योद्धा सिनेमाचं पोस्टर, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 2:22 PM

'योद्धा' या बहुप्रतिक्षित चित्रपटाची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळाली.

Yodha Poster Launch : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'योद्धा' हा त्याचा अ‍ॅक्शनपट सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळाली. पण आता सिध्दार्थच्या चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. 

नुकतेच 'योद्धा' या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. अनोख्या पद्धतीने या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले. आकाशात स्कायडायविंग करत चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले. या  व्हिडीओमध्ये  सिध्दार्थ मल्होत्रा देखील आकाशात लहरत आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत असणारा हा चित्रपट १५ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. शिवाय येत्या १९ फेब्रुवारीला  टीझर रिलीज करण्यात येईल. पण त्याआधी स्कायडायविंग करत तब्बल १३,००० फूटावरून 'योद्धा' चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 

सिद्धार्थने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅंडलवर व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली. 'योद्धा' सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रासह अभिनेत्री दिशा पटानी आणि राशी खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच करण जोहर, शशांक खेतान, अपूर्व मेहता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शिवाय पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अॅक्शन आणि रोमान्सने परिपूर्ण असणाऱ्या या चित्रपटात काही मजेदार गोष्टी पाहायला मिळणार असल्याचं सिद्धार्थने सांगितलं होतं. आता त्याच पद्धतीने आता चित्रपटाचं पोस्टर देखील लॉन्च करण्यात आलं आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्राकरण जोहरदिशा पाटनी