Join us  

बॉलिवूडच्या या अभिनेत्याला एकेकाळी वर्णभेदाचा करावा लागला होता सामना, पदोपदी झाली होती अवहेलना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 4:39 PM

बॉलिवूडच्या या अभिनेत्याला करियरच्या सुरूवातीला त्याच्या रंगावरून व पर्सनॅलिटीवरून हिणवले जायचे.

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळात नवाजला खूप स्ट्रगल करावा लागला होतो. त्याला इंडस्ट्रीत काम मिळवताना रंगभेदाचा सामना करावा लागला होता. फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर त्याच्या घराण्यातही त्याला या गोष्टीवरून हिणवले जात होते.

आज तकच्या रिपोर्टनुसार गाव कनेक्शनच्या एका मुलाखतीत निलेश मिश्रासोबत केलेल्या बातचीतमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितले की, लोक जेव्हा एनएसडीमधून बाहेर पडले की त्यांना लगेच मुंबईत काम मिळते असे वाटायचे. पण, माझी सुरूवात मार खाऊन झाली. या सगळ्याची सुरूवात माझ्या गावापासूनच झाली. माझ्या पर्सनॅलिटिला खूप कमी लेखले जायचे. 

नवाजने पुढे सांगितले की, ऑफिसला जायाचो तिथे असिस्टंट समोर उभा राहिलो की ते माझे वर पासून खालपर्यंत निरीक्षण करायचे आणि विचारायचे काय आहे? त्यावर मी बोलायचो मी अॅक्टर आहे. मग, ते म्हणायचे की तुला पाहून वाटत तर नाही. त्यांना मी अभिनय किंवा काही स्पीच ऐकवायचो. पण ते तू त्या टाईपचे मटेरियल नाही असे सांगायचे. त्यावर नवाज त्यांना मटेरियल काय असते मी त्यावरही काम करेन असे सांगायचा. असे बऱ्याचदा त्याच्यासोबत घडल्याचे नवाज सांगतो.

नवाज म्हणाला की, दुकानातून फेअर अँड लवलीसारखी क्रीम विकत घेऊन लावायचो.

नवाजुद्दीनने त्याच्या कुटुंबाबद्दल सांगताना म्हणाला की, आमच्या कुटुंबात सगळे उंच धिप्पाड आणि गोरेपान आहेत. फक्त माझे आई-वडील सावळे आणि उंचीला कमी होते. तसाच मीही झालो. बाकी सगळे आमच्या घराण्यात उंच धिप्पाड आणि गोरेपान आहेत. त्यामुळे त्यांनी माझा स्वीकार कधीच केला नाही. त्यामुळे रंगाची आणि पर्सनॅलिटीची भीती तेव्हापासूनच मनात निर्माण झाली.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी