Join us  

गोविंदाला उगाच म्हणत नाहीत ‘हिरो नंबर 1’, आहे इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 4:55 PM

आज गोविंदा बॉलिवूडमध्ये फारसा अ‍ॅक्टिव्ह नाही. पण म्हणून त्याची क्रेज कमी झालेली नाही. 

ठळक मुद्देगोविंदाने त्याच्या करिअरमध्ये 165 पेक्षा अधिक सिनेमांमध्येकाम केले.

गोविंदा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. एकेकाळी गोविंदाचा सिनेमा म्हटल्यावर प्रेक्षकांच्या उड्या पडत. आज गोविंदा बॉलिवूडमध्ये फारसा अ‍ॅक्टिव्ह नाही. पण म्हणून त्याची क्रेज कमी झालेली नाही. आजही त्याच्याबद्दल जाणून घ्यायला चाहते उत्सुक दिसतात. 90 च्या दशकात  बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणा-या गोविंदाकडे एकूण संपत्ती किती आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे? आज आम्ही याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

1986 साली गोविंदाचा पहिला सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाचे नाव होते इल्जाम. तेव्हापासून आजपर्यंत त्याने एक मोठा पल्ला गाठला. गोविंदाच्या संपत्तीबद्दल बोलाल तर  आजघडीला तो 150 कोटींचा मालक आहे. एका ऑनलाइन पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये गोविंदाची एकूण संपत्ती 151.28 कोटींच्या घरात आहे.

गोविंदाने त्याच्या करिअरमध्ये 165 पेक्षा अधिक सिनेमांमध्येकाम केले. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या़ कॉमेडी, ड्रामा, रोमान्स, अ‍ॅक्शन अशा प्रत्येक रूपात तो प्रेक्षकांना भावला. अर्थात गेल्या 10 वर्षांत त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. अलीकडच्या काळात किल दिल, हॅपी एंडिंग, फ्राइडे, रंगीला राजा असे त्याचे काही सिनेमे आलेत़ पण ते सगळेच फ्लॉप ठरलेत.

आंखें, राजा बाबू, कुली नंबर 1, हीरो नंबर 1, दीवाना मस्ताना, दुल्हे राजा, बड़े मियां, छोटे मियां, अनाड़ी नंबर 1, हसीना मान जाएगी, साजन चले ससुराल आणि जोड़ी नंबर 1 या हिट चित्रपटांमध्ये गोविंदाने काम केले आहे. 

टॅग्स :गोविंदा