Join us  

बॉलिवूडवर पुन्हा एकदा शोककळा, ‘अंधाधुन’च्या अ‍ॅक्शन डायरेक्टरचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 12:32 PM

उपचारापूर्वीच काळाने घातली झडप 

ठळक मुद्देअ‍ॅक्शन दिग्दर्शक अकबर बक्शी यांचा असिस्टंट म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली होती.

यंदाच्या वर्षात बॉलिवूडने अनेक दिग्गज गमावले. अनेक कलाकार जग सोडून गेलेत. आता बॉलिवूडचे अ‍ॅक्शन दिग्दर्शक परवेज खान यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अंधाधुन आणि बदलापूर अशा सुपरहिट चित्रपटांसाठी अ‍ॅक्शन दिग्दर्शक म्हणून काम करणाºया परवेज यांनी वयाच्या 55 वर्षी अंतिम श्वास घेतला. परवेज यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्री त्यांनी छाती दुखत असल्याची तक्रार केली होती. सोमवारी सकाळी त्यांना तातडीने मुंबईच्या रूबी रूग्णालयात दाखल हलविण्यात आले. यादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

परवेज खान यांना सोमवारी सकाळी हृदय विकाराचा झटका आला आणि उपचारापूर्वीच  त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांना आरोग्याशी संबंधित कोणताही त्रास नव्हता. परवेज यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.  दिग्दर्शक हंसल मेहता यांनी   ट्विट करत परवेज यांना श्रद्धांजली वाहिली. परवेज आणि हंसल यांनी ‘शाहिद’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. 

परवेज यांनी बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलेय. अ‍ॅक्शन दिग्दर्शक अकबर बक्शी यांचा असिस्टंट म्हणून त्यांनी करिअरची सुरुवात केली होती.  अक्षय कुमारचा चित्रपट खिलाडी, शाहरुख खानचा बाजीगर आणि बॉबी देओलचा सोल्जर या चित्रपटासाठी त्यांनी असिस्टंट अ‍ॅक्शन डायरेक्ट म्हणून काम  केले होते. 2004 मध्ये त्यांनी रामगोपाल वर्मा यांच्यासोबत काम केले. त्यानंतर परवेज यांनी श्रीराम राघवन यांच्यासोबच जॉनी गद्दार, एजंट विनोद, बदलापूर आणि अंधाधुन या चित्रपटांसाठी काम केले.

टॅग्स :बॉलिवूड