Join us

​ संस्कारी पहलाज निहलानीच्या ज्यूलीमध्ये बोल्ड दृश्यांचा भडिमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 17:16 IST

पहलाज निहलानी आणि वाद याच्यात काही नवीन नाही. पहलाज निहलानी सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष असताना त्यांनी उडता पंजाब, बाबूमोशाय बंदूकबाज ...

पहलाज निहलानी आणि वाद याच्यात काही नवीन नाही. पहलाज निहलानी सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष असताना त्यांनी उडता पंजाब, बाबूमोशाय बंदूकबाज या चित्रपटातील बोल्ड दृश्य आणि हिंसक दृश्य यांवर आक्षेप घेतला होता. यामुळे चांगलाच वाद देखील निर्माण झाला होता. पहलाज निहलानी यांना नुकतेच सेन्सॉर बोर्डाच्या पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांचा सेन्सॉर बॉर्डमधील सगळा कालावधी हा कॉन्ट्रोव्हर्शल होता असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. पण हेच पहलाज निहलानी आता सेन्सॉर बॉर्डातून बाहेर पडल्यानंतर स्वतःतील संस्कार विसरून असंस्कारी बनले आहेत का हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. कारण त्यांच्या ज्यूली २ या आगामी चित्रपटातील बोल्ड दृश्यांची सध्या चांगलीच चर्चा आहे.ज्यूली २ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे पहलाज निहलानी हे प्रेझेंटर आणि डिस्ट्रीब्यूटर आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला असून या चित्रपटात अनेक बोल्ड दृश्य प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात राय लक्ष्मी प्रमुख भूमिकेत असून ती एक प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. ज्यूली २ हा चित्रपट तिचा पहिला बॉलिवूडचा चित्रपट आहे. या चित्रपटात तिने अनेक बोल्ड दृश्य दिली आहेत. या चित्रपटाचे पोस्टर गेल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. या पोस्टरची देखील चांगलीच चर्चा झाली होती. या पोस्टरमध्ये एक नग्न महिला प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती आणि पोस्टरवर बोल्ड... ब्यूटीफूल आणि ब्लेस्ड असे लिहिले होते. या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे. आता या ट्रेलरमध्ये किती बोल्ड दृश्य आहेत हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. Also Read : वाचा, ‘इंदू सरकार’,‘उडता पंजाब’,‘बजरंगी भाईजान’बद्दल पहलाज निहलानी यांचे धक्कादायक खुलासे!!