बोकाडियांची पावले मराठीकडे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:56 IST
आघाडीच्या कलावंतांना घेऊन बॉलिवूडमध्ये तब्बल 54 चित्रपट बनवणारे के. सी. बोकाडिया यांची पावले आता मराठी चित्रपटसृष्टीकडे वळली आहेत. लवकरच ...
बोकाडियांची पावले मराठीकडे!
आघाडीच्या कलावंतांना घेऊन बॉलिवूडमध्ये तब्बल 54 चित्रपट बनवणारे के. सी. बोकाडिया यांची पावले आता मराठी चित्रपटसृष्टीकडे वळली आहेत. लवकरच ते दोन मराठी चित्रपटांना प्रारंभ करणार आहेत.ओंजळभर पाणी या चित्रपटाच्या पोस्टर लाँचिंगप्रसंगी त्यांनीच ही घोषणा केली.मराठी चित्रपटसृष्टीतले सचिन पिळगावकर, महेश कोठारे हे माझे मित्र आहेत आणि त्यांच्याशी माझा सतत संपर्क असतो. आम्ही हिंदी फिल्मवालेसुद्धा मराठी चित्रपटांमुळे प्रभावित झालेलो आहोत. त्यामुळेच मराठी चित्रपट करण्याचे ठरवले, असे मनातले गुज बोकाडिया यांनी उलगडले. विक्रम गायकवाड या युवा दिग्दर्शकाने ओंजळभर पाणी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.