Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिअरमध्ये बॉबी देओलला ‘ही’ चूक भोवली; स्वत: केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 17:01 IST

तब्बल चार वर्षे सिल्वर स्क्रीनपासून दूर राहणाºया बॉबीने त्याच्या करिअरवरून खूप मोठा खुलासा केला आहे. करिअरमध्ये कुठल्या गोष्टी भोवल्या याविषयी त्याने सांगितले आहे.

सध्या अभिनेता बॉबी देओल त्याच्या आगामी ‘रेस-३’मुळे भलताच चर्चेत आहे. हा चित्रपट त्याच्यासाठी ‘ट्रम्प कार्ड’ ठरू शकतो. ९० च्या दशकात ‘सोल्जर, गुप्त, अजनबी आणि हमराज’सारखे सुपरहिट चित्रपट देऊनही बॉबीला म्हणावे तसे करिअर करता आले नाही. बॉबीच्या आयुष्यात एक काळ असाही आला, जेव्हा काम मिळत नव्हते म्हणून दिल्लीच्या एका क्लबमध्ये तो चक्क डीजे म्हणून काम करू लागला. दरम्यान, आपल्या फ्लॉप करिअरवर पहिल्यांदा बॉबीने एक मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बॉबीने म्हटले की, ‘मला अशी अपेक्षा होती की, दोन-तीन चित्रपट केल्यानंतर माझे करिअर यशाच्या शिखरावर पोहोचणार. मात्र मी ते स्टारडम समजू शकलो नाही. मी माझ्या लोकप्रियतेकडे खूपच सामान्यपणे बघत होतो. मला हे कळालेच नाही की, केव्हा मी उंच शिखरावर पोहोचलो. आता माझी अशी इच्छा आहे की, पुन्हा एकदा सर्व काही पहिल्यासारखेच व्हावे. लोकांनी मला नोटीस करावे. आता मला यावर खूप लक्ष द्यावे लागणार आहे, जेणेकरून मी हे पुन्हा गमावून बसू नये. मी कधीच माझ्या स्पर्धकांकडे लक्ष दिले नाही. कारण मी माझ्या करिअरवरून फोकस दूर केले अन् चित्रपट दुसºयांना मिळत गेले. मी कधी हा विचारच केला नाही की, लोक माझ्याशी स्पर्धा करतील. मला असे वाटत होते की, सर्वांनाच काम मिळायला हवे. त्यामुळे आपण त्यांच्या वाटेत जाणे योग्य नाही. परंतु मी चुकीचा विचार करीत होतो. त्यामुळे बºयाच गोष्टी घडत गेल्या. इतर लोक निर्मात्यांच्या कार्यालयात जाऊन काम मागायचे. परंतु मी असे कधीच केले नाही. मला याची कधी जाणीवच झाली नाही की, माझ्या हातून सर्व गोष्टी निसटत आहेत. मला याची अगोदर जाणीव व्हायला हवी होती. मला तेव्हाच माझे फिजिक चांगले करायला हवे होते. परंतु आज खूप उशीर झाला आहे. दरम्यान, सिल्वर स्क्रीनपासून चार वर्षे दूर राहिल्यानंतर आता बॉबी सलमान खानसोबत कमबॅक करीत आहे. या व्यतिरिक्त त्याच्या अन्य तीन चित्रपटांच्या आॅफर आहेत. याविषयी बॉबीने सांगितले की, आता कुठल्याही प्रकारची नकारात्मकता मला रोखू शकणार नाही. सलमान खान एक खूप मोठा स्टार असून, त्याच्यात अजूनही खूप जोश आहे. अनिल कपूरमधील एनर्जीबद्दल बोलण्यास माझ्याकडे शब्द नाहीत. माझे वडील ८२ वर्षांचे आहेत, मात्र अशातही त्यांना प्रत्येक दिवशी काम करण्याची इच्छा आहे. माझा मोठा भाऊही (सनी देओल) अशाच स्वभावाचा आहे. मला अजूनही हे समजले नाही की, मी अद्यापपर्यंत त्यांच्याकडून या गोष्टी का शिकलो नाही.