सलमान खानच्या ‘या’ आॅनस्क्रिन बहिणीसोबत बॉबी देओलला करायचे होते लग्न, पण...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 21:32 IST
अभिनेता बॉबी देओल सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘रेस-३’मुळे चांगलाच लाइमलाइटमध्ये आहे. ...
सलमान खानच्या ‘या’ आॅनस्क्रिन बहिणीसोबत बॉबी देओलला करायचे होते लग्न, पण...!
अभिनेता बॉबी देओल सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘रेस-३’मुळे चांगलाच लाइमलाइटमध्ये आहे. ‘बरसात’ या चित्रपटातून डेब्यू करणारा बॉबी देओल कुठल्याही प्रकारच्या कॉन्ट्रोव्हर्सीपासून दूर राहणे पसंत करतो. त्यामुळेच त्याच्या करिअरमध्ये तो कधीही वादाच्या भोवºयात सापडला नाही. परंतु आता त्याच्या करिअरमधील एक मोठे रहस्य समोर आले असून, त्यामुळे तो काहीसा कॉन्ट्रोव्हर्सीत सापडताना दिसत आहे. ८० चे दशक होते. जेव्हा बॉबी देओल इंडस्ट्रीतील सर्वांत सुंदर अभिनेत्रीला आपले मन देऊन बसला होता. दोघांकडूनही एकमेकांना सारखाच प्रतिसाद होता. त्यामुळे दोघीही लग्नाच्या बंधनात अडकण्यास उत्सुक होते. मग असे काय घडले असेल की, दोघे एकमेकांचे होऊ शकले नाहीत? त्याचाच खुलासा आम्ही या वृत्तात करीत आहोत. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणीही नसून, ८० आणि ९० च्या दशकात बºयाचशा चित्रपटात झळकलेली नीलम कोठारी आहे. त्याकाळी बॉबी आणि नीलमच्या अफेअरची चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये होती. दोघीही एकमेकांवर जीवापाड प्रेम करीत होते. त्यांनी लग्नाचा निश्चियही केला होता. मात्र पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघे अतिशय दु:खदरीत्या विभक्त झाले. वास्तविक बॉबीचे वडील धर्मेंद्र यांचा या लग्नाला विरोध होता. धर्मेंद्र यांना अजिबातच वाटत नव्हते की, सनी आणि बॉबीने एखाद्या अभिनेत्रीशी विवाह करावा. त्यामुळेच बॉबी देओलचे नीलमसोबत लग्न होऊ शकले नाही. पुढे १९९६ मध्ये बॉबीने तान्या आहुजाबरोबर लग्न केले. दोघांची भेट मुंबईतील एका रेस्टॉरेंटमध्ये झाली होती. तान्या पेशाने एक इंटिरियर डिझायनर आहे. बॉबी आणि तान्या या दाम्पत्याला दोन मुले आहेत. बॉबीला ‘बिच्छू, सोल्जर, गुप्त’ या चित्रपटातून ओळख मिळाली, तर दुसरीकडे नीलम कोठारीने २०११ मध्ये अभिनेता समीर सोनी याच्याशी लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षांनंतर या दाम्पत्याने एका मुलीला दत्तक घेतले. नीलमने ‘हम साथ साथ है’ या चित्रपटात सलमान खानच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या व्यतिरिक्त ‘एक था राजा’, ‘एक लड़का एक लड़की’, ‘इल्जाम’, ‘सिंदूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या.